Tipu Sultan Garden Row
Tipu Sultan Garden Row sarkarnama
देश

Tipu Sultan Garden Row: 'मविआ' ला सरकारचा दणका ; "मालाडच्या गार्डनचं नावं.."

सरकारनामा ब्युरो

Tipu Sultan Garden Row : गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकारने मालाड येथील एका गार्डनचे नाव 'टिपू सूलतान गार्डन'असे दिले होते. यावरुन राजकारण तापलं होतं. काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांच्या हस्ते या उद्यानाचे लोकार्पण झाले होते. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर विरोधक भाजपने टीकेची झोड उठवली होती.

सहा महिन्यापूर्वी राज्यात सत्तातर झाल्यानंतर आघाडी सरकराचे अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलले आहेत. तर काही निर्णयावर फेरनिर्णय घेण्याचा सपाटा शिंदे सरकारने लावला आहे. अशातच भाजपचे नेते, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आघाडी सरकारने मालाड येथील गार्डन बाबत घेतलेला एक निर्णय रद्द केला आहे. याबाबत लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला आहे.

मालाड येथील टिपू सूलतान गार्डनचे नाव हडविण्याचा आदेश लोढा यांनी दिला आहे. याबाबत लोढा यांनी टि्वट करीत माहिती दिली आहे. "गेल्यावर्षी आघाडी सरकारच्या विरोधात या गार्डनच्या नावाबाबत आंदोलन करण्यात आले होते. खासदार गोपाळ शेट्टी यांनी हे नाव हटवावे, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीत केली होती. त्यांची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आघाडी सरकारच्या काळात या उद्यानाला दिलेले टिपू सुलतान हे नाव हटविण्याचा आदेश दिला आहे," असे लोढा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

"मैदानाला नाव देण्याचे काम महानगरपालिकेचे आहे. मंत्री अस्लम शेख हे त्या मैदानाचे नामकरण करायला गेले नाहीत. तर त्यांच्या निधीतून या मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याचे ते उद्घाटन करणार आहेत. त्या मैदानाचं टिपू सुलतान हे नाव पूर्वीपासून आहे. पण भाजपा विनाकारण त्याला धार्मिक रंग देत आहे," असे त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते.

"ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अत्याचार केले, तो देशगौरव होऊ शकत नाही. त्याचे नाव मैदानाला देणे सर्वथा गैर आहे. आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. हा निर्णय रद्द झाला पाहिजे." असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. कॉंग्रेसने मात्र आम्ही ते नाव दिलेच नाही. हा आमचा अधिकार नाही असं म्हणत हात वर केले आहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT