Pariksha Pe Charcha 2023 : मोदी गुरुजींनी विद्यार्थ्यांना दिला हा कानमंत्र

Pariksha Pe Charcha: मोदींनी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेविषयीची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
Pariksha Pe Charcha 2023
Pariksha Pe Charcha 2023 sarkarnama
Published on
Updated on

PM Narendra Modi: "तुम्ही समाजासाठी चांगले द्याल, तर प्रत्येक जण तुमच्याकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करेल, मी राजकारणात आहे, तरीही प्रत्येक निवडणुकीत जिंकण्याची माझी जिद्द असतेच, प्रत्येक वेळी जास्तीत जास्त मतांनी निवडणूक येण्याचा प्रयत्न करीत असतो," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात आज मोदींनी दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. बोर्डाच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं यावेळी मोदींनी दिली. तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी, याचा कानमंत्र मोदींनी यावेळी दिला. मोदींनी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेविषयीची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

Pariksha Pe Charcha 2023
Documentary on Modi : मोदींवरील डॉक्युमेंट्रीला ABVP चे सडेतोड उत्तर ; 'द काश्मीर फाइल्स'..

या कार्यक्रमासाठी 20 लाखांहून अधिक प्रश्न प्राप्त झाल्याची माहिती शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. या प्रश्नांमध्ये कौटुंबिक दबाव,तणाव व्यवस्थापन, आरोग्य आणि तंदुरुस्त कसे राहायचे आणि करिअर निवड यासारखे विविध प्रश्न चर्चेसाठी निवडण्या आले होते. परीक्षेचा ताण आणि इतर समस्यांशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मोदींनी दिलखुलास उत्तरे दिली.

Pariksha Pe Charcha 2023
Vishal Dhume News : निलंबित एसीपी ढुमेंचे अजब किस्से; दारू, चिकन-बिर्याणीवाले तर होतेच; दूधवालादेखील सोडला नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले..

  • "परीक्षेचा ताण घेऊ नका. हा जीवनाचा जन्मजात भाग आहे. हे छोटे टप्पे आहेत. त्यांनी घाबरू नका.

  • तुम्ही पहिल्यांदाच परीक्षा देत आहात का? तुम्ही अनेकवेळा परीक्षा दिली आहे.

  • अनुभवांना तुमची ताकद बनवा. तुम्ही जे करत आहात, त्यावर विश्वास ठेवा.

  • आपण एवढ्या परीक्षा दिल्या आहेत की त्यांचा आता आपल्याला सराव झाला आहे.

  • आपण परीक्षेसाठी कधीही तयार आहोत, असे समजूनच परीक्षा द्या. ताण घेण्याची गरज नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com