Modi ki Gurantee Sarkarnama
देश

BJP Manifesto 2024 : भाजपचा जाहीरनामा अन् मोदींच्या भाषणातून ‘हे’ दोन शब्द गायब!

Rahul Gandhi News : राहुल गांधी यांच्याकडून प्रचारसभांमध्ये सातत्याने बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा उपस्थित केला जातो. पुन्हा त्यांनी याच मुद्द्यांवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीसाठी आज भाजपने जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. या जाहीरनाम्याला (BJP Manifesto 2024) मोदी की गॅरंटी असे नाव देण्यात आले आहे. वन नेशन वन इलेक्शन, समान नागरिक कायद्याची अंमलबजावणी यांसह अनेक मोठ्या घोषणा यामध्ये करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता काँग्रेसने या जाहीरनाम्यावर निशाणा साधत देशातील बेरोजगारी आणि महागाई मुद्दा उपस्थित केला आहे.

भाजपचा (BJP) जाहीरनामा प्रसिध्द झाल्यानंतर काँग्रेसच्या नेते राहुल गांधींनी एक्सवरून टीका केली आहे. भाजपचा जाहीरनामा आणि नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) भाषणातून दोन शब्द गायब आहेत – महागाई आणि बेरोजगारी. लोकांच्या आयुष्याशी संबंधित महत्वाच्या मुद्यांवर भाजप चर्चाही करू इच्छित नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीचा (India Alliance) प्लॅन स्पष्ट आहे, 30 लाख पदांची भरती आणि प्रत्येक शिक्षित युवकाला एक लाखाची पक्की नोकरी. यावेळी युवक मोदींना भुलणार नाहीत. आता ते काँग्रेसचा हात मजबूत करून देशात रोजगार क्रांती आणतील, असा विश्वास राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे भाजपच्या जाहीरनाम्यात?

·         बचत गटांना आयटी, आरोग्य, पर्यटन क्षेत्रात प्रशिक्षण देणार

·         उज्ज्वला योजनेतंर्गत गरीब महिलांना सबसिडी जाहीर केली होती, ती आता 31 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.

·         गरिब खेळाडूंना विशेष मदत देणार, महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार

·         तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार

·         पुढील पाच वर्षे मोफत रेशन योजना सुरू राहणार

·         तृतीय पंथियांना आयुष्यमान योजनेत आणणार

·         पाईपमार्फत स्वस्त गॅस घरोघरी पोहोचवणार

·         मुद्रा योजनेची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये केली आहे.

·         पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.

·         शेतकरी, पशुमालक, मासेमारी करणाऱ्यांना सशक्त बनविणार

·         तमिळ भाषाला वैश्विक भाषा करण्यासाठी प्रयत्न करणार

·         70 वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेत आणणार

·         गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधण्याची योजना आहे.

·         एक राष्ट्र, एक निवडणूक आणि समान मतदारयादी प्रणाली सुरू केली जाईल.

·         वंदे भारत 3 प्रकार स्लीपर, चेअर, मेट्रो

·         बुलेट ट्रेन नवीन उत्तर,दक्षिण पुर्व भारतात टाकणार

·         देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर करणार.

·         ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब, सरंक्षण आयुधे हब निर्माण करा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT