Filipe Nery Rodrigues Sarkarnama
देश

चारवेळा आमदार आणि मंत्री असलेल्या नेत्याचा भाजपला रामराम

भाजपला आतापर्यंत तीन मंत्र्यासह सहा आमदारांनी सोडचिठ्ठी दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

गोवा : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीत भाजपला गुरूवारी आणखी एक मोठा धक्का बसला. एकीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) उमेदवारी अर्ज भरत असताना दुसरीकडे जलसंपदा मंत्र्यांनीच पक्षाला रामराम टोकला आहे. चारवेळा आमदार राहिलेल्या या नेत्याच्या 'एक्झिट'मुळे भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. भाजप सोडणारे ते सहावे आमदार आणि तिसरे कॅबिनेट मंत्री ठरले आहेत.

फिलिप नेरी रॉड्रिग्ज (Filipe Nery Rodrigues) यांनी गुरूवारी सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते दक्षिण गोव्यातील वेलिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पण यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी पत्रकार सॅविओ रॉड्रिग्ज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे निराश झालेल्या फिलिप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते काही दिवसांपासूनच पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती.

जुलै 2019 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या 10 आमदारांपैकी फिलिप हे एक होते. काँग्रेसकडून ते 1999 पासून वेलिम मतदारसंघातून विजयी होत आले आहेत. भाजपने ऐनवेळी त्यांचे तिकीट कापले आहे. मागील आठवड्यात 34 उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव नव्हतं. तसेच या यादीत नाव नसल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री दिपक पाऊसकर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्याचप्रमाणे या महिन्याच्या सुरूवातीला घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता एकून तीन मंत्र्यांसह सहा आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) तिकिट भाजपने कापले. त्यामुळे उत्पल यांनी भाजपला रामराम करून पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. ते गुरूवारी (ता. 27) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपला गळती

राज्यात भाजपला गळती लागल्याचे चित्र असून, आतापर्यंत सहा आमदारांनी पक्ष सोडला आहे. मायकल लोबो, पाऊसकर आणि फिलिप या मंत्र्यांनी पक्ष सोडला आहे. याचबरोबर प्रवीण झांटे यांनीही आमदारकीची राजीनामा दिला आहे. प्रवीण झांटे हे राज्यातील मोठे उद्योगपती आहेत. अलिना सलडान्हा यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आम आदमी पक्षात प्रवेश करत उमेदवारीही मिळवली आहे. त्यांच्यानंतर कार्लोस अल्मेडा या भाजप आमदाराने राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (Goa Political News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT