Mohan Charan Majhi Sarkarnama
देश

Mohan Charan Majhi : मोदी-शाहांचे ओडिशातही धक्कातंत्र; मुख्यमंत्रिपदी मोहन चरण माझी...

Rajanand More

Odisha CM : ओडिशामध्ये नवीन पटनायक यांची 24 वर्षांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी मोहन चरण माझी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माझी यांच्या नावाची घोषणा केली.

नवीन भाजप सरकारमध्ये कनक वर्धन सिंह देव आणि प्रभाती प्रविदा हे उपमुख्यमंत्री असतील. भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत माझी यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. राजनाथ सिंह यांच्यासह भूपेंद्र यादव निरीक्षक होते. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत माझी यांचे नाव चर्चेत नव्हते.

मोहन चरण माझी हे ओडिशाचे पंधरावे मुख्यमंत्री असतील. तर राज्यातील भाजपच्या पहिल्या सरकारचे नेतृत्व करणार आहेत. 52 वर्षीय माझी चारवेळा आमदार झाले आहेत. 2019 मध्ये त ओडिशातील क्योधंर विधानसभा मतदारसंघातून विजय झाले होते. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी होणार आहे.

2000 ते 2009 पर्यंत क्योंझर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2024 मध्येही याच मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला आहे. ओडिशातील आदिवासींचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच त्यांचे संघटनात्मक कौशल्यही चांगले असल्याने भाजपकडून त्यांना संधी दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान, भाजपने ओडिशामध्ये बिजू जनता दलाचा दारूण पराभव केला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 78 जागांवर विजय मिळवला असून एकहाती सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे पटनायक यांची 24 वर्षांची सत्ता भाजपने उलथवून टाकण्यात य़श मिळवले आहे. राज्यात भाजप पहिल्यांदाच सत्तेत आले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT