NDA Cabinet : मोदींच्या कॅबिनेटमध्ये मुलगा, सून, जावई..! मंत्रिमंडळ नव्हे ‘परिवार मंडळ’…

PM Narendra Modi Cabinet Modi Government NDA Mantri Mandal : नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे.
Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi, PM Narendra ModiSarkarnama

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या कॅबिनेटमधील बहुतेक मंत्र्यांनी खातेवाटप झाल्यानंतर कामकाजाला सुरूवात केली आहे. पण मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांवरून आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. मोदींसह भाजपमधील नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल यांच्यासह इतर नेत्यांवर घराणेशाहीवरून टीका केली जात होती.

राहुल यांनी घऱाणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत मोदींना घेरले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत वीस मंत्र्याची यादीच जाहीर केली आहे. त्यांच्या घराणेशाहीचा उल्लेखही त्यांनी यामध्ये केला आहे. ‘कथनी आणि करनी’मधील याच फरकाला नरेंद्र मोदी म्हणतात, असा प्रहार राहुल यांनी केला आहे.

भाजपकडून राहुल यांच्यावर शहजादा, युवराज अशी टीका केली जाते. त्यावरही राहुल यांनी सूचक भाष्य केले आहे. अनेक पिढ्यांचा संघर्ष, सेवा आणि बलिदानाच्या परंपरेला घराणेशाही म्हणणारे आपल्या ‘सरकारी परिवारा’ला सत्तेचा वारसा वाटत आहे, असा निशाणाही राहुल यांनी साधला.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Chandrababu Naidu : चंद्राबाबूंचा जगनमोहन यांना शपथविधीआधीच पहिला झटका; राजधानीबाबत मोठी घोषणा

राहुल यांच्या यादीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह महाराष्ट्रातील रक्षा खडसे अशा वीस जणांची नावे आहेत. मंत्रिमंडळ या शब्दाऐवजी राहुल यांनी एनडीएचे ‘परिवार मंडळ’ हा शब्द वापरला आहे. माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री, आमदार यांचे पुत्र, कन्या, सून, जावई, नातू, पत्नी आदींचा मंत्रिमंडळात समावेश आहे.

एनडीए ‘परिवार मंडळा’तील मंत्री...

जे. पी. नड्डा – माजी खासदार व मंत्री जयश्री बॅनर्जी यांचे जावई.

एच. डी. कुमारस्वामी – माजी पंतप्रधान एच. डी. कुमारस्वामी यांचे पुत्र.

ज्योतिरादित्य शिंदे – माजी केंद्रीय मंत्री माधवरावर शिंदे यांच्या पुत्र.

किरेन रिजिजू – अरुणाचल प्रदेशातील पहिले हंगामी (प्रो-टेम) अध्यक्ष रिंचिन खारू यांचे पुत्र.

रक्षा खडसे – महाराष्ट्रातील आमदार व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून.

जयंत चौधरी – माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे नातू.

चिराग पासवान – माजी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचे पुत्र.

कमलेश पासवान – उत्तर प्रदेशातील लोकसभेचे उमेदवार ओम प्रकाश पासवान यांचे पुत्र.

रामनाथ ठाकूर – बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र.

राम मोहन नायडू – माजी केंद्रीय मंत्री येरेन नायडू यांचे पुत्र.

जितीन प्रसाद – उत्तर प्रदेशातील माजी खासदार जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र.

शंतनू ठाकूर – पश्चिम बंगालमधील माजी मंत्री मंजूल कृष्णा ठाकूर यांचे पुत्र.

राव इंद्रजित सिंह – हरियाणाचे माजी मुख्यमंत्री राव वीरेंद्र सिंह यांचे पुत्र.

पियुष गोयल – माजी केंद्रीय मंत्री वेद प्रकाश गोयल यांचे पुत्र.

कीर्ती वर्धन सिंह - उत्तर प्रदेशातील माजी मंत्री महाराज आनंद सिंह यांचे पुत्र.

वीरेंद्र कुमार खाटीक – मध्य प्रदेशातील माजी मंत्री गौरीशंकर सेजवार यांचे मेहुणे.

रवनीतसिंह बिट्टू – पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंत सिंग यांचे नातू.

धर्मेंद्र प्रधान – माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान यांचे पुत्र.

अनुप्रिया पटेल – अपना दल आणि बहुजन समाज पक्षाचे संस्थापक सदस्य सोनेलाल पटेल यांच्या कन्या.

अनुप्रिया देवी – बिहारमधील माजी आमदार रमेश प्रसाद यादव यांच्या पत्नी.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com