BJP Flag Sarkarnama
देश

BJP News: विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपच्या बड्या नेत्याला 'जोर का झटका'; उच्च न्यायालयाकडून थेट आमदारकीच रद्द

Uttar Pradesh News: बिजनौर जिल्ह्यातील नेहतौर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार ओम कुमार यांची निवड अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता.26 नोव्हेंबर) रद्द केली आहे. न्यायालयानं संबंधित भाजप नेत्याच्या उमेदवारी अर्जातील त्रुटींमुळे हा धक्कादायक निर्णय दिला आहे.

Deepak Kulkarni

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पुढील वर्षी होत आहे. या निवडणुकीसाठी भाजप,समाजवादी पार्टी,काँग्रेस यांसह प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील एका भाजप आमदाराला न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे.

बिजनौर जिल्ह्यातील नेहतौर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार ओम कुमार यांची निवड अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता.26 नोव्हेंबर) रद्द केली आहे. न्यायालयानं संबंधित भाजप नेत्याच्या उमेदवारी अर्जातील त्रुटींमुळे हा धक्कादायक निर्णय दिला आहे. पण न्यायालयाने या आदेशाच्या अंमलबजावणीला पुढील 15 दिवसांची मर्यादित स्थगिती दिल्याचंही जाहीर केलं आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या 2022 च्या निवडणुकीत भाजपच्या ओम कुमार यांनी अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या नेहतौर मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार मुन्शी राम यांचा अवघ्या 258 मतांनी पराभव केला निसटता विजय मिळवला होता.

राष्ट्रीय लोकदलाचे पराभूत उमेदवार मुन्शी राम यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात ओम कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. आता न्यायमूर्ती सलील कुमार राय यांनी मुन्शी राम यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका अंशतः मंजूर केली आहे. मात्र, पुढील 15 दिवस ओम कुमार यांना आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची आणि या कालावधीत विधानसभा अधिवेशन झाल्यास चर्चेत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.

ओम कुमार यांनी निवडणुकीवेळी सादर केलेल्या फॉर्म 26 मधील प्रतिज्ञापत्रात गंभीर त्रुटी होती. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 36(2) आणि 36(4) अंतर्गत त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळणे आवश्यक होते, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने स्वीकारला. उमेदवारी अर्जाचा हा चुकीचा स्वीकार निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारा ठरल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.

न्यायालयाने यावेळी ओम कुमार यांनी निवडणूक लढवली नसती, तर त्यांना मिळालेली मते मुन्शी राम यांना मिळाली असती, असा कोणताही ठोस पुरावा आढळून आला नसल्याचंही नमूद केलं आहे. तसेच ओम कुमार यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने स्वीकारला गेला म्हणून त्यांना मिळालेली मते वाया गेलेली मते मानता येणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT