Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी (ता.२६ नोव्हेंबर) नव्या महिला प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. रोहिणी खडसे यांच्या जागी विदर्भातील नागपूरच्या डॉ. अंजली साळवे यांच्याकडे महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. रोहिणी खडसे यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला होता. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अभ्यासू, मुद्देसूद आणि सडेतोड भूमिका आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेल्या साळवे यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं आहे.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अंजली साळवे यांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याची अधिकृत घोषणा केली.
तर दुसरीकडे मुंबई महिला अध्यक्ष (NMC) पदी संगीता वाझे यांची निवड करण्यात आली. ही नियुक्ती पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांच्या मंजुरीनंतर केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडियावरील अधिकृत पोस्टमध्ये अंजली साळवे यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेत, महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी, त्यांना संघटित करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच मोठा हातभार लागेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.