A viral video allegedly shows a fire brigade vehicle being used to wash an Innova at BJP MLA Ramniwas Shah’s residence, triggering a debate over government resources. Sarkarnama
देश

BJP MLA Viral Video : भाजप आमदाराचा थाट, गाडी धुण्यासाठी फायर ब्रिगेड कामाला; टीका होताच काढली इतरांची लायकी, गाडी काय आमदार धुवतात का?

BJP MLA Ramniwas Shah, Ramniwas Shah viral video, fire brigade vehicle controversy, fire brigade washing car : फायर ब्रिगेडसारख्या आपत्कालीन सेवांचा खासगी वापर करून आमदाराचा थाट उघड; व्हिडिओ व्हायरल होताच नागरिक आणि विरोधकांकडून संतापाचा उद्रेक.

Rajanand More

BJP MLA Car Washed Viral Video by Fire Brigade : काही आमदार, खासदारांचा थाट पाहून डोळे विस्फारतात. अशाच एका आमदाराचा थाट समोर आला आहे. आपल्या मालकीची कार धुवण्यासाठी या आमदारांनी चक्क फायर ब्रिगेडला कामाला लावले. एवढेच नाही तर यावरून टीका होऊ लागताच त्यांनी टीकाकारांची थेट लायकीच काढली. गाडी काय आमदार धुवतात का?, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

मध्य प्रदेशातील सिंगरौली मतदारसंघाचे भाजपचे आमदार रामनिवास शाह यांचा हा थाट कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्यावरून टीकेची झोड उठली आहे. फायर ब्रिगेड ही आपत्कालीन सेवा आहे. असे असताना आमदारांकडून त्याचा वापर खासगी कामासाठी तोही कार धुवायला केला जात असल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत मीडियाने आमदार शाह यांच्याकडे विचारणा केली. त्यावर त्यांनी हा विषय उचलून धरणाऱ्या लोकांची लायकी काय आहे, असे सांगत एकप्रकारे आपण काही चुकीचे केले नाही, यावर शिक्कामोर्तब केले. गाडी काय आमदार धुवतात का, असे म्हणत त्यांनी कहरच केला. शाह यांच्यावर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. त्यावरूनही शाह यांना काँग्रेसवर पलटवार केला.

काँग्रेसने सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, काहीवेळा काही भाजपचे नेते जनतेला भाडे का टट्टू म्हणतात, तर यांच्यासारखे आमदार जनतेचा अशाप्रकारे अपमान करत आहेत. जनतेला लुटा, मजा करा आणि कुणी प्रश्न विचारला तर त्यांना शिव्या द्या, हा भाजप नेत्यांचा फंडा असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

आमदार शाह यांनी खुलासा करताना सांगितले की, मीही व्हिडिओ पाहिला आहे. आमदार किंवा खासदार आपली गाडी स्वत: धुवत नाही. चालकाने सांगितले की, फायर ब्रिगेडची गाडी महापौरांच्या घरी पाणी भरण्यासाठी आली होती. त्याचवेळी माझी गाडी तिथे उभी होती. यावेळी चालकाने थोडे पाणी मारले. मी चालकाला याबाबत खडसावले आहे, असे पुन्हा करू नये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT