RK Imo Singh  Sarkarnama
देश

सासऱ्याला टाकलं मागे; भाजपच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांचा जावई पाचपट अधिक श्रीमंत

मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामा ब्युरो

इम्फाळ : मणिपूरच्या (Manipur) विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) दोन टप्प्यांत मतदान होणार असून पहिला टप्पा 27 फेब्रुवारी तर दुसरा टप्पा 3 मार्चला होणार आहे. मणिपूरमध्ये निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेले असताना मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचे जावई चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे जावई भाजपकडून (BJP) मैदानात उतरले असून, त्यांच्या संपत्तीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे जावई आमदार आर. के. इमोसिंह हे आहेत. ते सगोलबंद मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. त्यांच्या संपत्तीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. इमो सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. ही मालमत्ता मुख्यमंत्री बिरेनसिंह यांच्या मालमत्तेच्या तब्बल पाच पट अधिक आहे. मणिपूर विधानसभा निवडणुकीतील ते सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

इमोसिंह यांच्याकडे 5 कोटी 10 लाख 94 हजार 917 रुपयांची मालमत्ता आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री बिरेनसिंह यांची एकूण मालमत्ता 1 कोटी साडेआठ लाख रुपये आहे. इमोसिंह यांच्याकडे 1 कोटी 14 लाख 37 हजारांची जंगम मालमत्ता आहे. यात 2 लाख 16 हजार 400 रुपयांची रोकड आणि 7 खात्यात 37 लाख रुपये आहेत. इमोसिंह यांच्याकडे तीन गाड्या असून त्यात 6.5 लाख रुपयांची मारुती जिप्सी, 16 लाख 65 हजाराची महिंद्रा स्कॉर्पिओ आणि 18 लाख 38 हजार रुपयांची हार्ले डेव्हिडसन दुचाकी गाडीचा समावेश आहे. एवढेच नाही त्यांच्याकडे बंदूक आणि पिस्तूल देखील आहे.

इमोसिंह यांच्या पत्नी अंजुबाला नोंगथोंगबाम यांच्याकडे 2 कोटी 13 लाख 20 हजारांची मालमत्ता आहे. इमोसिंह यांच्याकडे 3 कोटी 96 लाख 57 हजार 138 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यात 15 लाख रुपयांची स्वत: कमावलेली मालमत्ता असून, 1 कोटी 37 लाख 7 हजार रुपयांची मालमत्ता वारशाने मिळाली आहे. तसेच, 2 कोटी 44 लाख रुपयांच्या इमारतींचा समावेश आहे. त्यांच्यावर बँकेचे 44 लाख रुपयांचे कर्ज आहे. इमोसिंह हे मणिपूरचे पहिले केंद्रीय मंत्री राजकुमार जयचंद्र सिंह यांचे मोठे चिरंजीव आहेत. राजकुमार जयचंद्र सिंह हे राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. गेल्यावर्षी कॉंग्रेस पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून निलंबित केले असता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. इमोसिंह यांच्यावर कोणताही प्रलंबित खटला नसल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT