CCTV footage shows BJP MLA Suresh Gowda’s daughter Aishwarya Gowda arguing with a woman police PSI during a temple dispute in Karnataka. Sarkarnama
देश

BJP MLA daughter : भाजप आमदाराच्या लेकीने PSI सविता पाटील यांच्या कानशिलात लगावली; पोलिसी खाक्या दाखवताच वडील झुकले...

BJP MLA Daughter Slaps Woman PSI : व्हायरल होत असलेल्या CCTV फुटेजमध्ये आमदाराची मुलगी ऐश्वर्या गौडा हिने थेट महिला पोलिसाच्या कानशिलात लगावल्याचं दिसत आहे. त्यानंतर पाटील यांनीही ऐश्वर्याला प्रत्युत्तर दिलं. तर या घटनेनंतर PSI पाटील यांनी क्याथनहळ्ळी पोलीस ठाण्यात ऐश्वर्या गौडा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Jagdish Patil

Karnataka Temple Row : भाजप आमदाराच्या मुलीची दादागिरी समोर आली आहे. मंदिराच्या गर्भगृहात जाण्यावरून झालेल्या वादातून आमदाराच्या मुलीने थेट कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या (PSI) कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये आमदाराची मुलगी महिला पोलिसासोबत वाद घालताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील उक्कड मंदिरात १२ ऑगस्ट रोजी रात्री हा प्रकार घडला. भीम अमावस्येच्या उत्सवादरम्यान स्थानिक आमदार सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या गौडा दर्शनासाठी मंदिरात आली होती. यावेळी तिला गर्भगृहात जाण्यापासून पोलिसांनी रोखले. यावरून तिचा महिला PSI सविता पाटील यांच्यासोबत वाद झाला.

वाद वाढल्यानंतर ऐश्वर्या गौडा हिने थेट महिला पोलिसाच्या कानशिलात लगावल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसत आहे. त्यानंतर सविता पाटील यांनीही ऐश्वर्याला प्रत्युत्तर दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेनंतर PSI सविता पाटील यांनी क्याथनहळ्ळी पोलीस ठाण्यात ऐश्वर्या गौडा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. ऐश्वर्याने शिवीगाळ करत मारहाण केली आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मात्र, सुरुवातीला पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, ऐश्वर्या गौडा यांनीही महिला PSI सविता पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्या असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

आमदार गौडांची माफी

या घटनेवर आमदार सुरेश गौडा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी मुलगी दर्शनासाठी मंदिरात गेली होती. तिने गर्भगृहात जाण्याची विनंती केली होती. मात्र, पोलिसांनी तिला आत जाण्याची परवानगी दिली नाही. एका सर्कल इन्स्पेक्टरला मात्र आत जाऊ दिल्याने तिने पुन्हा विनंती केली, असे त्यांनी सांगितले.

यावेळी महिला पोलिसाने माझ्या मुलीला शिवीगाळ केल्याचे समजते. त्यानंतर दोघींमध्ये वाद आणि मारामारी झाली, असा दावा आमदारांनी केला. माझ्या मुलीने महिला पोलिसाच्या कानशिलात मारल्याचा व्हिडिओ मी अद्याप पाहिलेला नाही. मात्र, या घटनेबद्दल मी माफी मागतो आणि मला याचे वाईट वाटते, असेही सुरेश गौडा यांनी म्हटले. आमदाराच्या मुलीनेच कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसावर हात उचलल्याने या घटनेची चर्चा कर्नाटकात सुरू झाली आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून पुढे काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT