

Maharashtra BJP new office bearers: आगामी राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. केंद्रीय पातळीवरील संघटनरचनेत बदल केल्यानंतर आता महाराष्ट्र भाजपनेही विविध प्रकोष्ठांच्या प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी या नियुक्त्यांची घोषणा केली.
भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर यासंदर्भातील पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. समाजातील विविध घटक, व्यावसायिक क्षेत्रे, सामाजिक संस्था आणि विशिष्ट समूहांशी पक्षाचा समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
नव्या नियुक्त्यांमध्ये विधी प्रकोष्ठाची जबाबदारी भूषण महाडिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बुद्धिजीवी प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी विश्वास पाठक, उद्योग प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी प्रदेश सहकोषाध्यक्ष आमदार अरुण लखानी, वैद्यकीय प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी डॉ. भारती पवार, तर सहकार प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सांस्कृतिक प्रकोष्ठाची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर देण्यात आली आहे. भटके-विमुक्त प्रकोष्ठासाठी प्रदेश उपाध्यक्ष गोपीचंद पडळकर, जैन समाज प्रकोष्ठासाठी मंगलप्रभात लोढा, आयुष्मान भारत प्रकोष्ठासाठी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, तर मीडिया प्रकोष्ठासाठी प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिव्यांग प्रकोष्ठासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रभारी म्हणून, तर जयसिंग कृष्णराव चव्हाण यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडिया प्रकोष्ठाची जबाबदारी प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
शिक्षक प्रकोष्ठासाठी सुनील लोढा, व्यापार प्रकोष्ठासाठी किरीट भंसाली, आर्थिक प्रकोष्ठासाठी मिलिंद कानडे, मच्छिमार प्रकोष्ठासाठी वेतन पाटील, बुनकर प्रकोष्ठासाठी मनोज दिवटे, कामगार प्रकोष्ठासाठी मिलिंद तुळसकर आणि उत्तर भारतीय प्रकोष्ठासाठी आर. डी. यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठासाठी तुषार भोसले, ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठासाठी अनुप मोरे, पदवीधर प्रकोष्ठासाठी सुनील लोढा, दक्षिण भारतीय प्रकोष्ठासाठी राजेश पिल्ले, बेटी बचाओ-बेटी पढाओ प्रकोष्ठासाठी अल्पा अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सेवाभावी संस्था (NGO) संपर्क प्रकोष्ठाची जबाबदारी डॉ. विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ कार्यकर्ता प्रकोष्ठाची जबाबदारी आमदार सुनील कर्जतकर, ग्रामविकास व पंचायतराज प्रकोष्ठाची जबाबदारी सुधाकर भोयर आणि फ्रेंड्स ऑफ बीजेपी प्रकोष्ठाची जबाबदारी उषा वाजपेयी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
IT प्रकोष्ठासाठी तेजस मालविया, क्रीडा प्रकोष्ठासाठी केदार जाधव, बंगाली प्रकोष्ठासाठी शुभागत दास, रेल्वे प्रवासी प्रकोष्ठासाठी कैलास वर्मा, अभियंता प्रकोष्ठासाठी आमदार प्रशांत ठाकूर, राजस्थानी प्रकोष्ठासाठी देवीसिंग पुरोहित, सुशासन प्रकोष्ठासाठी प्रदीप पेशकार आणि परराष्ट्र संबंध विभागाच्या प्रकोष्ठासाठी आमदार सुनील राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तृतीयपंथी प्रकोष्ठाची जबाबदारी डॉ. सान्वी जेठवा यांच्यावर देण्यात आली आहे. या नियुक्त्यांमधून भाजपने समाजातील विविध घटकांमध्ये संघटन मजबूत करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. आगामी काळातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या प्रकोष्ठांच्या माध्यमातून पक्षाचा जनसंपर्क आणि संघटन विस्तार अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.