BJP
BJP  Sarkarnama
देश

Karnataka Assembly Election : कर्नाटकातील भाजप आमदारांना ‘गुजरात मॉडेल’ची चिंता : कुणाचा पत्ता कट होणार.... कुणाला लॉटरी लागणार?

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच राज्यातील कॉंग्रेस, भाजप व धजद पक्ष आता उमेदवार निवडीच्या प्रक्रीयेला गती देत आहेत. उमेदवार निवड प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी जोरदार लॉबिंग सुरू केले असून औत्सुक्य वाढले आहे. उमेदवार निवडताना भाजप गुजरात पॅटर्नचा अवलंब करण्याची शक्यात आहे. त्यानुसार अनेक विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारुन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. (BJP MLAs in Karnataka are worried about the 'Gujarat model')

कॉंग्रेस, भाजप व धजद या प्रमुख पक्षांचा सभा, मेळावे जवळपास बंद झाले आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आता उमेदवार निवडीवर लक्ष केंद्रीत केले आहे. कॉंग्रेस आणि धजदने यापूर्वीच आपली पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. दरम्यान, सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. काहींनी बंगळूर व दिल्ली गाठली असून जोरदार लॉबिंग सुरू आहे.

सत्ताधारी भाजप उमेदवार निवडीत पिछाडीवर आहे. पक्षाच्या उमेदवारांची निवड प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. हायकमांड स्तरावर सर्व्हेक्षण झाले असले तरी उमेदवार निवडीबाबत नेत्यांच्या बैठका पूर्ण झालेल्या नाहीत. उमेदवार निवडताना भाजप गुजरात पॅटर्नचा अवलंब करण्याची शक्यात आहे. त्यानुसार अनेक विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारुन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

विजयासाठीचे निकष आणि सर्वेक्षण अहवालाच्या आधारे भाजप उमेदवारांची निवड करेल. संभाव्य उमेदवारांची यादी आधीच तयार आहे. यादी अंतिम करण्याची कसरत आजपासून सुरू झाली आहे. ही यादी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे. त्याला ४-५ दिवसांचा अवधी लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

दुसऱ्या यादीसाठी काँग्रेसची आज बैठक

काँग्रेसने १२४ उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीच जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीसाठी वेग आला आहे. काँग्रेस पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक उद्या (ता. ३१) होत आहे. या बैठकीत उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांची यादी तयार करून ती हायकमांडकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल. काँग्रेसची दुसरी यादी दहा एप्रिलनंतर जाहीर होणार आहे. स्क्रीनिंग समितीचे अध्यक्ष मोहन प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, बी. के. हरिप्रसाद, काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील उपस्थित राहतील.

‘आप’ सर्व २२४ जागा लढविणार

आम आदमी पक्षाने (आप) प्रथमच कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आप’ने सर्व २२४ जागा लढविणार असून उमेदवार यादी मात्र अजून जाहीर केलेली नाही.

धजदची दुसरी यादी लवकरच

काँग्रेस-भाजपच्या आधी ९३ मेदवारांची पहिली यादी जाहीर करून धजदने आघाडी घेतली होती. दुसरी यादी तयार करण्याकडे धजदने लक्ष दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT