Ajit Pawar On Supreme Court : ...हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? आम्ही बोललो तर सत्ताधाऱ्यांना राग यायचा : अजित पवारांनी खडसावले

धार्मिक वक्तव्यासंदर्भात बोलताना न्यायाधीश केएम जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे आणि ते काहीच करत नाही. त्यामुळं हे सर्व काही होत आहे,असे म्हटले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सरकारला ‘नपुंसक सरकार’ असे म्हटले आहे. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा सरकारचा कमीपणा नाही का? अधिवेशनात आम्ही हेच सांगत होतो, त्याबद्दल बोलत होतो. पण त्यावेळी सत्ताधाऱ्यांना राग येत होता, त्यांना वाईट वाटतं होतं, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला. (Isn't this an insult to Maharashtra, Ajit Pawar asked Shinde-Fadnavis Government)

मुंबईतील हिंदू जनआक्रोश रॅली प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यासुनावणी दरम्यान धार्मिक वक्तव्यासंदर्भात बोलताना न्यायाधीश के. एम. जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे आणि ते काहीच करत नाही, असे सुनावले होते.

Ajit Pawar
Mangalwedha Market Committee Election: मंगळवेढ्यात परिचारक-भालके युती कायम; भाजप आमदार आवताडेंची डोकेदुखी वाढणार

त्यासंदर्भात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारला नपुंसक असे म्हटलेले आहे. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा सरकारचा कमीपणा नाही का?अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही चार आठवडे तेच सांगत होतो, त्याबद्दल बोलत होतो. पण त्यांना राग येतो, वाईट वाटतं.

या सरकारच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे, त्यावर अजून निर्णय येणे बाकी आहे. सोळा आमदारांच्या अपत्रातेबाबतचा निकाल अजूनही झालेला नाही. त्याबद्दल आम्ही बोललो तर सरकारमधील प्रमुखांना त्याचं वाईट वाटतं. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, ज्यात आपण सर्वजण राहतो. त्या सरकारच्या कारभाला नपुंसक सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. आता राज्यकर्त्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी द्वेष कोणाला द्यायचा. त्याचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन त्यांनी करावं, असेही अजितदादांनी सुनावले.

Ajit Pawar
B. S. Yediyurappa's Big Announcement: भाजप नेत्याची मोठी घोषणा: 'मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही'

धर्म आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असायला हव्यात, असे कोर्टाने म्हटले आहे. पण, ते फार पूर्वीपासून सांगितले जातंय. प्रत्येकांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करा. समाजात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, याची जाबाबदारी सरकारची असते, असेही पवार यांनी नमूद केले.

काय म्हणाले होते सर्वोच्च न्यायालय?

मुंबईतील हिंदू जन आक्रोश रॅली प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्या सुनावणीदरम्यान धार्मिक वक्तव्यासंदर्भात बोलताना न्यायाधीश केएम जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे आणि ते काहीच करत नाही. त्यामुळं हे सर्व काही होत आहे. ज्यावेळेला राजकारण आणि धर्म वेगळा होईल. तेव्हा हे सगळं संपुष्टात येईल. राजकारण्यांनी धर्म आणि राजकारण वेगळं करायला हवं, या शब्दांत जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारला झोडपले.

Ajit Pawar
Kirit Somaiya On Girish Bapat: ‘पुण्यात भाजपचा महापौर होणार, हे आम्ही स्वप्नातही बघत नव्हतो; पण ते बापटांमुळे शक्य झाले’

सरकारच्या वतीने बाजू मांडणाऱ्या सॉलिटर जनरल तुषार मेहता यांनाही ‘तुम्ही नाटक बंद करा. धार्मिक वक्तव्यासंदर्भात तुम्ही काय करत आहात, हे सांगा,’ अशा शब्दांत सुनावले. न्यायाधीश जोसेफ म्हणाले, तेढ निर्माण करणारी भाषा एक दुष्टचक्र आहे. यावर लोक प्रतिक्रिया देणार. हे थांबवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं.

आपण कोणत्या दिशेने जात आहोत?

न्यायमूर्ती नागरत्ना यांनी या सर्व विधानांवर चिंता व्यक्त करत ‘आपण कोणत्या दिशेने जात आहोत,’ असा सवाल केला. आपल्याकडे जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी यांसारखे नेते झाले. नेहरू यांचं मध्यरात्रीचं भाषण पाहा. आता सगळ्या पक्षातील लोकांकडून आपत्तीजनक वक्तव्य येत आहे, असे म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com