Raj Thackeray, BrijBhushan Sharan Singh sarkarnama
देश

आता हा 'गेम' राज ठाकरेंच्या हातात! भाजप खासदाराने योगींनाही पकडलं कोंडीत

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे अयोध्येतील खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध कायम आहे. त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दिला. (Raj Thackeray Ayodhya visit Latest Marathi News)

सिंह यांनी पत्रकार परिषदेत 2008 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या काही उत्तर भारतीयांना आणलं होतं. त्यांनीही यावेळी आपल्याला झालेल्या मारहाणीचा अनुभव सांगितला. यावेळी सिंह यांनी राज ठाकरे यांना विरोध कायम राहणार असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशची जनता, साधू-संत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापैकी कुणाचीही माफी मागावी. आम्ही त्यांचे स्वागत करू, असं सिंह पुन्हा स्पष्ट केलं आहे. (Brijbhushan Singh Latest Marathi News)

आता हा 'गेम' राज ठाकरे यांच्याच हातात असल्याचे सिंह यांनी सांगितले. राज ठाकरे माफी मागेपर्यंत त्यांना भेटू नये, असं आवाहनही सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केलं आहे. त्यामुळे आता या मुद्दावरून योगींची कोंडी झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र भाजपमधूनही राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध होऊ लागला आहे. मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनीच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. याबाबत ठाकूर यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं आहे.

यात त्यांनी म्हटलं आहे की, उत्तर भारतीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती, त्याविषयी राज ठाकरे यांनी खेद व्यक्त करावा. भविष्यात भाजपसोबत युती करण्याआधी हे व्हायला पाहिजे आणि त्यासाठी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरेंवर दबाव आणावा. (BJP Latest Marathi News Update)

राज ठाकरेंनी फेरीवाले, टॅक्सीवाले तसेच मजूर या सर्व कष्टकरी वर्गांची माफी मागावी. अन्यथा त्यांच्या अयोध्या दौऱ्याला आमचा कडाडून विरोध असेल. मी घटनात्मक पद्धतीने विचार मांडत आहे. दृष्कृत्याला दृष्कृत्य करून विरोध करण्याची आवश्यकता नाही. मात्र, आम्ही राज ठाकरेंवर निश्चित दबाव आणू शकतो. त्यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी स्वच्छ चारित्र्य घेऊन देशासमोर जावे. त्यामुळे तुमचे हे पाऊल केवळ राजकारणासाठी नसल्याचे स्पष्ट होईल, असंही ठाकूर यांनी म्हटलं आहे. ठाकूर यांच्या या भूमिकेमुळे आता भाजपचीही कोंडी झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT