मुंबई : भाजपचे अयोध्येतील खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला आहे. याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘रामाच्या चरणी जो जात असेल त्याला जाऊ द्यावे, विरोध करण्याचे काहीच कारण नाही’ असा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र भाजपमधूनच या दौऱ्याला विरोध होऊ लागला असून, थेट केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांच्याकडं धाव घेण्यात आळी आहे.. (Raj Thackeray Ayodhya visit Latest Marathi News)
मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनीच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. याबाबत ठाकूर यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, उत्तर भारतीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती, त्याविषयी राज ठाकरे यांनी खेद व्यक्त करावा. भविष्यात भाजपसोबत युती करण्याआधी हे व्हायला पाहिजे आणि त्यासाठी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरेंवर दबाव आणावा. (BJP Latest Marathi News Update)
राज ठाकरेंनी फेरीवाले, टॅक्सीवाले तसेच मजूर या सर्व कष्टकरी वर्गांची माफी मागावी. अन्यथा त्यांच्या अयोध्या दौऱ्याला आमचा कडाडून विरोध असेल. मी घटनात्मक पद्धतीने विचार मांडत आहे. दृष्कृत्याला दृष्कृत्य करून विरोध करण्याची आवश्यकता नाही. मात्र, आम्ही राज ठाकरेंवर निश्चित दबाव आणू शकतो. त्यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी स्वच्छ चारित्र्य घेऊन देशासमोर जावे. त्यामुळे तुमचे हे पाऊल केवळ राजकारणासाठी नसल्याचे स्पष्ट होईल, असंही ठाकूर यांनी म्हटलं आहे. ठाकूर यांच्या या भूमिकेमुळे आता भाजपचीही कोंडी झाली आहे.
ब्रिजभूषणसिंह यांचाही विरोध
ब्रिजभूषणसिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे हे दबंग नेते नाहीत. त्यांना अयोध्येत यायचे असेल तर आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी. त्यांनी माफी न मागितल्यास आत्ताच नव्हे तर यापुढेही उत्तर भारतात कोणत्याही राज्यात येऊ देणार नाही, असा इशारा सिंह यांनी दिला आहे. सिंह यांच्याकडून विरोध करण्यासाठी ठिकठिकाणी बैठकाही घेतल्या जात आहेत.
काय म्हणाले होते फडणवीस?
खासदार ब्रिजभूषणसिंह हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध का करत आहे. हे माहिती नाही. माझे त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. परंतु श्रीराम चरणी जात असेल त्याला जाऊ द्यावं, असं म्हणत फडणवीस यांना राज ठाकरे यांच्या दौऱ्याला पाठिंबा दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.