Nishikant Dubey, Mahua Moitra Sarkarnama
देश

Mahua Moitra : ...म्हणून महुआ मोईत्रांची खासदारकी घालवणाऱ्या दुबेंना झाले दु:ख

Cash For Query Case : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केली होती तक्रार...

Rajanand More

BJP MP Nishikant Dubey : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी या कारवाईवरून आनंद व्यक्त केला. पण मोईत्रा यांची तक्रार करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना मात्र दु:ख झाले आहे. कालचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा नव्हता, असे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.

लोकसभेत (Lok Sabha) प्रश्न उपस्थित करण्यासाठी मोईत्रा यांच्याकडून लाच घेतली जात असल्याची तक्रार दुबे यांनी केली होती. त्यानंतर संसदेच्या (Parliament) शिस्तपालन समितीने (Ethics Committee) या प्रकरणाची चौकशी करून शुक्रवारी लोकसभेत अहवाल सादर केला. या अहवालामध्ये मोईत्रा यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार आवाजी मतदानाने याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.

मोईत्रा यांची खासदारकी गेल्यानंतर दुबे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना दुबे म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षा (National Security) आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लोकसभेचे सदस्यत्व गेल्याने मला दु:ख झाले. कालचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा नव्हता, तर दु:खाचा होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मोईत्रा यांचा एक्स बॉयफ्रेंड जय अनंत देहाद्राई यांनीच दुबे यांना पत्र पाठवून कॅश फॉर क्वेरी प्रकरणाची माहिती दिली होती. त्यांनी सीबीआयकडेही याची तक्रार की होती. दुबे यांनी या मुद्यावर मोईत्रा यांना घेरले. त्यामुळे त्यांना खासदारकीवर पाणी सोडावे लागले.

तत्पुर्वी, मोईत्रा यांच्याकडे दुबे यांच्या पदवीवर सातत्याने आक्षेप घेतले जात होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने खडाजंगी उडत होती. संसदेत मोईत्रा या अदानी समूहावरून आक्रमकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर टीका करत होत्या. त्यामुळे त्यांना अडकवण्यात आल्याचा आरोपा इंडिया आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT