Mayank Joshi with Akhilesh Yadav Sarkarnama
देश

भाजपला मोठा धक्का; मतदानाच्या काही तास आधीच मयांक जोशी विरोधी गोटात

भाजपच्या खासदार रीटा बहुगुणा जोशी यांचे पुत्र मयांक जोशी यांनी खळबळ उडवून दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या काही तास आधी भाजपच्या खासदार रीटा बहुगुणा जोशी (Rita Bahuguna Joshi) यांचे पुत्र मयांक जोशी (Mayank Joshi) यांनी खळबळ उडवून दिली आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या मयांक यांनी मंगळवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली आहे. या भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

रीटा बहुगुणा यांनी मुलाला तिकीट मिळावे यासाठी जाहीरपणे खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. तरीही पक्षाने त्यांच्या मुलाचे तिकीट कापून जोशींना धक्का दिला आहे. यामुळे जोशी या नाराज आहेत. आतापर्यंत निवडणुकीच्या प्रचारातही फारशा दिसल्या नाहीत. त्यातच मयांक यांनी अखिलेश यांची भेट घेतल्याने भाजपच्या (BJP) गोटात तर्कवितर्क लढवले जात आहेत. (UP Election Updates)

ही भेट राजकीय स्वरूपाची नसल्याचा दावा मयांक यांनी केला आहे. पण त्यांनी भाजपमध्ये राहणार असल्याबाबत थेट काहीही वक्तव्य न केल्यानं त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ते म्हणाले, ही एक शिष्टाचार म्हणून भेट होती. पण जिथे माझा उपयोग होईल किंवा कोणी मला बोलवेल तिथे मी जाईन. जर कुणी बोलावलं नाही तर मी घरी बसून आराम करेन, असं सुचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

मयांक यांना लखनौ कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. मयांक आणि अखिलेश यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. अखिलेश यांनीच दोघांच्या भेटीचा फोटो शेअर करत तसे संकेत दिले आहेत. लखनऊ कॅन्टोन्मेंट मतदारसंघात मोठ्या संख्येने ब्राम्हण मतदार आहेत. त्यापैकी अनेकजण उत्तराखंडचे आहेत. रीटा बहुगुणा जोशी या मतदारसंघात दोनवेळा आमदार होत्या. या मतदारसंघासह पाचव्या टप्प्यातील प्रयागराज जिल्ह्यातील जागांवरही रीटा बहुगुणा यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. त्या प्रयागराजच्या पहिल्या महापौर होत्या. आता याच मतदारसंघाच्या त्या खासदार आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, अखिलेश यादव यांनी मयांक यांनी घरी बोलवून मोठा डाव टाकला आहे. एकीकडे लखनऊ कॅन्टोन्मेंटमधील रीटा बहुगुणांच्या समर्थकांना सुचक संदेश दिला तर दुसरीकडे ब्राम्हण वोटबॅंक वळविण्याचाही प्रयत्न केला आहे. रीटा बहुगुणा यांचा या भागात मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. त्याचा फटका भाजपला बसू शकतो, असेही विश्लेषकांचे मत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT