भाजप आमदारानं स्टेजवरच खुर्चीवर उभं राहत काढल्या उठाबशा अन् मागितली माफी

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा (UP Election 2022) प्रचार शिगेला पोहचला आहे.
Bhupesh Chaubey
Bhupesh ChaubeySarkarnama
Published on
Updated on

लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा (UP Election 2022) प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचार सभा, रोड शोच्या माध्यमातून उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे. मतदारांना खूश करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक क्लुप्त्या केल्या जात आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशातील रॉबर्टगंज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे (BJP) आमदार भूपेश चौबे (Bhupesh Chaubey) यांच्याबाबतीत हा किस्सा घडला आहे. त्यांच्या मतदारसंघातील मतदारांमध्ये मोठा रोष असल्याची चर्चा आहे. चौबे यांनी काहीच विकासकामे केली नसल्याचा दावा मतदारांकडून केला जात आहे. याची माहिती चौबे यांनाही होती. त्यामुळं पुन्हा मतं मागताना जनतेची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी थेट उठाबशा काढल्या. या मतदारसंघातून ते पुन्हा आपलं नशीब आजमावत आहेत.

Bhupesh Chaubey
मलिक हसतच ईडीच्या कार्यालयाबाहेर आले अन् वज्रमूठ दाखवत म्हणाले...

रॉबर्टगंज मुख्यालयामध्ये भाजपची बुधवारी प्रचार सभा होती. या सभेला आमदार चौबेही उपस्थित होते. यावेळी नाराज जनतेचं मन जिंकण्यासाठी ते स्टेजवरील खुर्चीवर उभे राहिले. सुरूवातीला हात जोडून त्यांनी मतदारांची माफी मागितली. नंतर काम पकडत उठाबशा काढण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांनी आपली चूक झाल्याचे मान्य करत पुन्हा असं होणार नाही, असा विश्वास जनतेला दिला.

यावेळी भाजपच्या इतर नेत्यांनी त्यांना उठाबशा काढण्यापासून रोखले. चौबे यांच्याविषयी मतदारसंघात मोठा असंतोष आहे. चौबे यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात काहीच विकास केला नाही. ही नाराजी दूर करण्यासाठी चौबे सार्वजनिक ठिकाणी मतदारांची माफी मागत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

यावरून काँग्रेसनंही (Congress) व्हिडीओ ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. छत्तीसगड प्रदेश काँगेस सेवादलानं हे ट्विट केलं आहे. रॉबर्टगंजचे भाजपचे आमदार भूपेश चौबे यांनी कान पकड उठाबशा काढल्या. पाच वर्षातील त्यांचं कुशासन जनतेनं विसरून जावं, यासाठी त्यांनी हे केलं. पण लोकशाहीमध्ये जनतेपक्षा ताकदवान कुणीही नाही, असं टोला ट्विटमध्ये लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com