दिल्लीच्या नामांतरबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. दिल्लीचं नाव बदलून तिला प्राचीन काळातील ‘इंद्रप्रस्थ’ हे नाव द्यावं, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. दिल्लीतील चांदणी चौकचे भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्यांनी या पत्रात दिल्लीचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला पुन्हा जिवंत करण्याची ही वेळ आली आहे.
खंडेलवाल यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, सध्याचं ‘दिल्ली’ हे नाव मुघल काळात उदयास आलं, पण याआधी या शहराचं नाव ‘इंद्रप्रस्थ’ होतं. महाभारतामध्ये पांडवांनी स्थापन केलेली राजधानी म्हणून इंद्रप्रस्थचा उल्लेख आहे. त्यामुळे राजधानीचं प्राचीन वैभव पुन्हा प्रकट करण्यासाठी नाव बदलण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दिल्लीचं नाव ‘इंद्रप्रस्थ’ ठेवलं जावं.
पुरानी दिल्ली रेल्वे स्टेशनचं नाव ‘इंद्रप्रस्थ जंक्शन’ करण्यात यावं.
दिल्ली विमानतळाला ‘इंद्रप्रस्थ एअरपोर्ट’ नाव द्यावं.
शहरातील प्रमुख ठिकाणी पांडवांच्या मूर्ती उभाराव्यात.
त्यांनी पत्रात नमूद केलं आहे की इंद्रप्रस्थ ही सुमारे 3000 वर्षांपूर्वी पांडवांची राजधानी होती आणि पुरातत्वीय पुरावेही त्याला आधार देतात. त्यामुळे मुघल काळाशी जोडलेली नावे बदलून दिल्लीच्या 5000 वर्ष जुन्या हिंदू सांस्कृतिक वारशाला पुन्हा अधोरेखित करण्याची ही वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दिल्लीच्या नामांतराची ही मागणी नवी नाही. याआधी विश्व हिंदू परिषदेनेही दिल्ली सरकारकडे अशीच मागणी केली होती. त्यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलण्याचं सुचवलं होतं. तसेच 2021 मध्ये भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी आणि क्षत्रिय महासभेनेही अशीच मागणी केली होती. मात्र, विरोधकांनी या मागण्यांना राजकीय डावपेच म्हणत फेटाळून लावलं आहे. सध्या या मागणीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, केंद्र सरकार या प्रस्तावावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.