Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

BJP National Convention : भाजपच्या 'हॅटट्रिक'साठी दिल्लीत 'ब्रेनवाॅश'

BJP National Convention भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. या अधिवेशनात पक्ष लोकसभा निवडणुकीचा Lok Sabha Election रोडमॅप निश्चित करेल.

Sachin Deshpande

Bharat Mandapam: भाजप आज लोकसभा निवडणुकीचा शंखनाद करणार आहे. यासाठी दिल्लीत स्थित भाजप मंडपम येथे साडेअकरा हजार प्रतिनिधी राष्ट्रीय अधिवेशनासाठी उपस्थित झाले आहे.

भाजप BJP सत्ता काळात केंद्राने केलेल्या कामांचे आणि योजनांचे बॅनर या ठिकाणी लावले असून, 2024 ची लोकसभा Lok Sabha Elections जिंकण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात येईल. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींच्या 400 पार ही घोषणा साकारण्याची रणनीती या राष्ट्रीय अधिवेशनात आखण्यात येईल. Prime Minister Narendra Modi to address BJP Convention on Sunday in New Delhi

भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. या अधिवेशनात पक्ष लोकसभा निवडणुकीचा Lok Sabha Election रोडमॅप निश्चित करेल. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा J P Nadda ध्वजारोहण करून राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करतील. या राष्ट्रीय अधिवेशनाची रविवारी सांगता पंतप्रधान मोदींच्या PM Narendra Modi भाषणाने होईल.

संमेलनस्थळी प्रदर्शनाच्या माध्यमातून विकसित भारताचा संकल्प मांडण्यात आला आहे. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यमंत्री, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाचे पदाधिकारी, खासदार आणि आमदारांसह सुमारे 11 हजार 500 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस (संघटन) यांनी शुक्रवारी राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आज दुपारी 3 वाजता ध्वजारोहण करून राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे भाषण महत्त्वाचे असेल. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकीतील मुद्दे आणि रणनीती याविषयी माहिती देण्याची शक्यता आहे. मोदींची गॅरंटी आणि 400 पारचा नारा यावर या अधिवेशनात फोकस राहील.

संमेलनस्थळी प्रदर्शनाच्या माध्यमातून विकसित भारताचा संकल्प मांडला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी दिल्लीत पोहाेचले असून, ते आजपासून विविध बैठकांमध्ये सहभागी होतील. या अधिवेशनातून भाजप नेत्यांमध्ये जोश निर्माण होण्यास मोठी मदत होईल.

राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीय मंत्रिमंडळात विविध राज्यांतील मंत्री, राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य पदाधिकारी, राष्ट्रीय परिषदेचे सदस्य, विद्यमान आणि माजी खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, माजी प्रदेशाध्यक्ष, लोकसभा क्लस्टर प्रभारी यांचा समावेश असेल. निमंत्रक, महापौर, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी, मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, मीडिया, सोशल मीडिया आणि आयटी सेलचे राज्य समन्वयक इत्यादी या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (JP Nadda ), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजप (BJP) नेत्यांमध्ये जोश निर्माण करण्याचे कार्य निश्चित करतील. त्या आधारेच भाजप संपूर्ण देशात 400 पार (Lok Sabha Election 2024) जागा जिंकण्याचा निर्धार करू शकते. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचे तर लक्ष आहेच. त्याचबरोबर काँग्रेस (Congress) आणि इंडिया (INDIA) आघाडीच्या नेत्यांचे या अधिवेशनाकडे लक्ष असेल.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT