Pankaja Munde News : पंकजा मुंडेंच्या अडचणी संपेनात; कारखान्याला 'जीएसटी'नंतर 'पीएफ'ची नोटीस

Vaidyanath Sahkari Sugar Factory : बीडच्या परळी तालुक्यातील पांगरी येथे असणारा वैद्यनाथ कारखाना गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे.
Pankaja Munde
Pankaja Mundesarkarnama
Published on
Updated on

Beed Politics : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला गेल्या वर्षी 'जीएसटी'ने नोटीस दिली होती. 19 कोटींचा जीएसटी भरला नसल्याचा ठपका ठेवत काही मालमत्ता सील केली होती. आता कारखान्याने कर्मचाऱ्यांचा 61 लाख 47 हजार रुपये थकीत पीएफ न भरल्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कारखान्याला नोटीस बजावली आहे. (Pankaja Munde News )

Pankaja Munde
Nilesh Lanke News : वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येतील आरोपींचा पोलिसांना दम, आमदार लंकेंचा गौप्यस्फोट

बीडच्या परळी तालुक्यातील पांगरी येथे असणारा वैद्यनाथ कारखाना गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. एप्रिल 2023 मध्ये जीएसटी विभागाने कारखान्याच्या कागदपत्रांची तपासणी करून 19 कोटींचा जीएसटी भरला नसल्याचा ठपका ठेवला होता. दरम्यानच्या काळात केंद्र शासनाने राज्यातील काही साखर कारखान्यांना अर्थसाह्य दिले. त्यात काही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्याचाही समावेश होता. मात्र, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) अध्यक्ष असलेल्या कारखान्याला अर्थसाह्य मिळाले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जीएसटी (GST) विभागाने सप्टेंबर 2023 मध्ये 19 कोटींच्या थकबाकीसाठी कारखान्याची काही मालमत्ता सील केली होती. त्यानंतर जानेवारीत युनियन बँकेने 203 कोटी 69 लाखांच्या थकबाकी प्रकरणी कारखान्याचा लिलाव जाहीर केला होता. यातून कारखाना प्रशासन सावरत नाही तोच संभाजीनगरच्या भविष्य निर्वाह निधीचे क्षेत्रीय आयुक्त तथा वसुली अधिकारी रमेशकुमार यांनी कारखान्याला नोटीस बजावली आहे.

पीएफ कार्यालयाने यापूर्वीही वैद्यनाथ कारखान्याला बाकी वसुलीची नोटीस बजावली होती. मात्र, कारखान्याने पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे आता पैसे न भरल्यास कारखान्याचे बँक खाते गोठवणे, स्थावर व जंगम मालमत्ता संलग्न करणे, मालमत्ता विक्री करणे, अटक करणे, आयपीसी कलम 403, 409 नुसार खटला अशा प्रकारची कारवाई होऊ शकते, असे नोटिशीत नमूद आहे.

R

Pankaja Munde
Milind Deora : काँग्रेस सोडण्यामागं नेमकं कारण काय? मिलिंद देवरा म्हणाले, "तो एक..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com