BJP Sarkarnama
देश

BJP Political News : भाजपची मोठी खेळी; विरोधी पक्षालाच घेतलं सत्तेत, 13 आमदारांमुळे वाढली ताकद

Tipra Motha News : टिपरा मोथा पक्षाने मागीलवर्षी विधानसभा निवडणुकीत सर्वांनाच धक्का देत मुसंडी मारली होती. आदिवासीबहुल भागात या पक्षाला 13 जागा मिळाल्या होत्या.

Rajanand More

Tripura News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने (BJP Political News) ईशान्येकडील राज्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. त्रिपुरामध्ये लोकसभेच्या केवळ दोनच जागा असल्या तरी भाजपने या राज्यात मोठी खेळी खेळली आहे. या राज्यात आज मोठी उलथापालथ झाली असून, राज्यातील प्रमुख विरोधी पक्षालाच भाजपने सत्तेत घेतले आहे. त्यामुळे लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने ‘सेफ’ केल्या आहेत.

त्रिपुरा (Tripura) विधानसभेचे विरोधी पक्षनेते अनिमेष देववर्मा यांनी या पदाचा सकाळीच राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानुसार त्यांचा टिपरा मोथा (Tipra Motha) हा पक्षच सत्तेत सहभागी झाल्याची बातमी आली. देववर्मा यांच्यासह वृतकेतू देववर्मा या दोघांनी आजच मंत्रिपदाची शपथही घेतली.

राज्यात 60 सदस्यीय विधानसभेत टिपरा मोथा पक्षाचे 13 विधायक आहेत. आता हा प्रमुख विरोधी पक्षच सरकारमध्ये (Government) सहभागी झाला आहे. या पक्षाची राज्याच्या आदिवासी भागात चांगली पकड आहे. राज्यात मुख्यमंत्री माणिक साहा (Manik saha) यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election) भाजपला 60 पैकी 32 जागा मिळाल्या होत्या, तर टिपरा मोथा पक्षाला 13, सीपीएमला 11 आणि काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या, तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आयपीएफटी पक्षाला एक जागा मिळाली होती. काँग्रेस आणि सीपीएमची निवडणुकीत आघाडी होती.

टिपरा मोथा पक्षामुळे आघाडीला फटका बसल्याचे मानले जाते. त्यांच्यामुळे आघाडीच्या जागा कमी झाल्याने भाजपची सत्ता आली. या पक्षानेही सर्व राजकीय आडाखे चुकीचे ठरवत घवघवीत यश मिळवत प्रमुख विरोधी पक्षाची खुर्ची मिळवली होती. आता हाच पक्ष भाजपसोबत गेला आहे. राज्यात सीपीएम प्रमुख विरोधी पक्ष बनणार आहे.

दरम्यान, त्रिपुरामध्ये लोकसभेच्या दोन जागा आहेत. मागील निवडणुकीत भाजपने दोन्ही जागांवर विजय मिळवला होता, पण विधानसभा निवडणुकीनंतर गणितं बदलल्याने टिपरा मोथा पक्षासोबत आघाडी करण्यासाठी स्थानिक नेत्यांचा आग्रह होता. आता हा पक्ष सोबत आल्याने भाजपला दोन्ही जागा पुन्हा मिळतील, अशी आशा नेत्यांना आहे. 

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT