Lok Sabha Election 2024 : सात राज्यांत काँग्रेसचा सुपडासाफ होणार; ‘एनडीए’ही 400 च्या आतच...

India Alliance : भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी एकत्रित येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. मात्र, या आघाडीला निवडणुकीत फारसे यश मिळणार नाही, असे चित्र आहे.
BJP, Congress
BJP, CongressSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) एनडीएने 400 हून अधिक जागा मिळवण्यासाठी कंबर कसली आहे, तर त्यांना रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीही जय्यत तयारीला लागली आहे, पण एनडीएसह इंडिया आघाडीलाही आपले लक्ष्य गाठता येणार नसल्याचे ताज्या सर्व्हेतून समोर आले आहे. दक्षिणेत भाजपला झगडावे लागणार असले, तर उत्तर भारतातून भरघोस मतं मिळणार आहेत. तर काँग्रेसचा मात्र सात राज्यांत सुपडासाफ होणार असल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आता काही आठवड्यांचाच कालावधी उरला आहे. प्रत्येक पक्षाची जागावाटप आणि उमेदवार निवडीसाठी लगबग सुरू आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत पराभूत झालेली काँग्रेस (Congress) चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी अनेक राज्यांमध्ये विविध पक्षांसोबत आघाडी केली जात आहे, पण त्याचा प्रत्यक निवडणुकीवर फारसा परिमाण होणार नाही.

BJP, Congress
Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये पुन्हा भूकंप होणार; काँग्रेस भाजपच्या मित्रपक्षाला फोडण्याच्या तयारीत

इंडिया टीव्ही-सीएनएक्सने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये देशभरात काँग्रेसला केवळ 37 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील दोन्ही निवडणुकांपेक्षा (Election) काँग्रेसची कामगिरी या वेळी सुमार राहील, असेच चित्र आहे. 2014 मध्ये काँग्रेसला 42 तर 2019 मध्ये त्यात दहा जागांची भर पडली होती. पण या वेळी पक्षाला चाळीशीही पार करता येणार नसल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पराभव झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांसह गुजरात, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ होऊ शकतो, तर भाजपला (BJP) या सर्व राज्यांतून दणदणीत विजय मिळेल, असे सर्व्हेतून समोर आले आहे.

उत्तर प्रदेशातही भाजपचेच पारडे जड राहणार असून, काँग्रेस आणि बसपाला प्रत्येकी केवळ एक जागा मिळू शकते, तर समाजवादी पक्षालाही दोनच जागांवर समाधान मानावे लागू शकते. इंडिया आघाडीला देशभरात केवळ 98 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर एनडीएलाही 400 चा आकडा गाठता येणार नाही. या आघाडीला 378 पर्यंत जागा मिळू शकतात. याचा अर्थ भाजपही 370 चा आकडा गाठू शकणार नाही, असे चित्र आहे.

  • R

BJP, Congress
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा मास्टरस्ट्रोक; मोठ्या पक्षाची साथ मिळणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com