Amit Shah sarkarnama
देश

Amit Shah News : अमित शाह यांनी केली सीतामातेच्या मंदिराची घोषणा; कुठे उभारणार?

Bihar elections Sita temple announcement : अमित शाह हे दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर होते. राज्याची विधानसभा निवडणुकीत पुढील काही महिन्यांत आहे.

Rajanand More

BJP Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. गोपालगंज येथे झालेल्या भरगच्च सभेत त्यांनी विरोधकांना निशाणा साधला. यावेळी एनडीएतील इतर पक्षांचे राज्यातील नेतेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी सीतामातेच्या मंदिर उभारण्याचीही घोषणा केली.

अमित शाह हे दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर होते. राज्याची विधानसभा निवडणुकीत पुढील काही महिन्यांत आहे. त्यासाठी सत्ताधारी एनडीएसह इतर विरोधी पक्षांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये भाजपनेही आघाडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन केले आहे.

रविवारी बिहारमध्ये बोलताना अमित शाह म्हणाले, मी सर्व धार्मिकस्थळांना वंदन करून सुरूवात करतो. या गोपालगंजच्या भूमीने नेहमीच देशाला नवा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लालू आणि कंपनीने राम मंदिर बनविण्यासाठी अडथळा आणला होता. पण आता सीतामातेचे मंदिर याच बिहारच्या जमिनीवर स्थापित केले जाईल, अशी घोषणा शहांनी केली.

विरोधकांवर टीकास्त्र

शहांनी यावेळी विरोधकांवरही जोरदार प्रहार केला. बिहारमध्ये यावर्षी निवडणूक आहे. बिहारला आता ठरवायचे आहे की, त्यांना लालू-राबडी यांच्या जंगलराजच्या मार्गाने जायचे आहे की मोदी-नितीश यांच्या विकासाच्या मार्गाने. मोदींनी दहा वर्षात अनेक विकासकामे केली, काँग्रेसला ती कधीच करता आली नाहीत.

लालूंनी केवळ एकच काम केले ते म्हणजे आपल्या कुटुंबाला सेट करण्याचे. दोन्ही मुले मुख्यमंत्रिपदाची तयारी करत आहेत. एक मुलगी राज्यसभेत खासदार आहे. दुसऱ्या मुलीला लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलं. पत्नी मुख्यमंत्री होत्या. पण लालूंनी बिहारच्या युवकांना सेट केले नाही. त्यांच्या काळात अपहरण, खंडणी, दंगल ही सामान्य गोष्ट होती. गोमातेचा चाराही त्यांना खाल्ला, अशी जोरदार टीका शाह यांनी यावेळी केली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT