
Karnataka Politics : भाजपमधील घराणेशाहीवर बोलल्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत आमदाराची हक्कापट्टी करण्यात आली आहे. पण या कारवाईनंतरही त्यांनी माघार घेतलेली नाही. त्यांनी पुन्हा एकदा घराणेशाहीवर प्रहार करत नव्या पक्षाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद टोकाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्नाटकातील भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांना नुकतेच पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय विजयेंद्र आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्यावरून पक्षातील घराणेशाहीवर टीका केली होती. आपण भाजपच्या विरोधात नसून घराणेशाहीच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते.
नव्या पक्षाबाबत बोलताना रविवारी पाटील म्हणाले, मी आणि माझे सहकारी नवीन पक्षाबाबत लोकांची मते जाणून घेऊ. संपूर्ण राज्यातील हिंदू कार्यकर्त्यांकडून निरोप येत आहे. कर्नाटकात हिंदू पक्ष स्थापन करण्याबाबत ते सांगत आहे. सध्याच्या भाजपच्या राज्यातील नेतृत्वाखाली हिंदू सुरक्षित नाहीत.
दरम्यान, भाजपन बसनगौडा पाटील यतनाळ यांना बुधवारी पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. सातत्याने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. निलंबित झाल्यानंतरही त्यांनी येडियुरप्पा पिता-पुत्रावरील हल्ला कायम ठेवला आहे. दोघांचे कर्नाटकातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर काँग्रेस नेत्यांसोबत साटेलोटे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
येडियुरप्पांच्या मुलाच्या स्वार्थी राजकारणामुळे पक्षातीव हिंदुत्वाचे समर्थन करणारे कार्यकर्ते दडपले जात आहेत. घराणेशाहीच्या राजकारणामुळे माझीही तीच अवस्था झाल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. पक्षाने विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे न करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमध्ये सातत्याने भाजपमध्ये घराणेशाहीला आणि भ्रष्टाचाराला थारा नाही, असे सांगतात. मग विजयेंद्र अजूनही पदावर कसे, असा सवाल बसनगौडा यतनाळ यांनी केला. विजयेंद्र भ्रष्टाचारी असून त्यांच्यामुळे येडीयुरप्पा यांना तुरुंगात जावे लागले. पीएसआय आणि 40 टक्के कमिशनमध्ये त्यांचे नाव आहे. अनेक घोटाळ्यांमध्ये नाव असलेल्या कुटुंबासोबत पक्ष असे तर राज्यातील हिंदू कार्यकर्त्यांना निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.