Pramod Sawant j p Nadda sarkarnama
देश

BJP Politics 'या' राज्यात नापास मंत्र्यांना घरी पाठवणार? जे पी नड्डा प्रगती पुस्तक तपासणार

BJP Politics Goa Pramod Sawant j p Nadda : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे संकेत दिले होते.

Roshan More

BJP Politics : गोवा विधानसभेच्या निवडणुकीला अजून बराच कालावधी शिल्लक आहे. मात्र, मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याचे संकेत डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. काम प्रगती नसणाऱ्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा हे दोन दिवसांत गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. नड्डा यांच्या भेटीनंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काही मंत्र्यांची धडधड वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत प्रमोद सावंत यांनी दिले होते. मात्र पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला. मात्र, अधिवेशनात सत्ताधारी भाजपवर सात विरोधक भारी चित्र होते. यावरुन भाजपचे आमदार मायकल लोबोंनी भाजपला घराचा आहेर देत पक्षात ऑल इज नॉट वेल असे म्हटले. लोबोंच्या वक्तव्याने पक्षात धूसफूस झाली खरी पण प्रदेशाध्यक्षांनी त्यांना समज देत विषयावर पडदा टाकला.

भाजपमध्ये ऑल इज वेल असल्याचे चित्र निर्माण करण्यात येत असले तरी प्रगती अणखी वेगाने करण्याच्या दृष्टिने मुख्यमंत्री सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळेच पावसाळी अधिवेशनानंतर खात्याला न्याय देऊ न शकणाऱ्या मंत्र्यांची गच्छंती होण्याची शक्यता वर्तवली आहे.

तीन मंत्र्यांना डच्चू

विद्यमान मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांना डच्चू मिळण्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर खुद्द मुख्यमंत्रीच नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा २४ ऑगस्ट रोजी गोव्यात येणार आहेत. चिंबल येथील भाजप मुख्यालयाच्या पायाभरणीसाठी नड्डा गोव्यात असतील. यानंतर मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. नड्डा मुख्यमंत्री सावंत आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्यासोबत चर्चेनंतर फेरबदलाबाबत निर्णय घेतला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT