J.P.Nadda| BJP-Shivsena|
J.P.Nadda| BJP-Shivsena|  
देश

Bjp Politics|महाराष्ट्रातून शिवसेना संपत चालली आहे..! जे.पी.नड्डांचे खळबळजनक विधान

सरकारनामा ब्युरो

पाटणा : देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी (BJP) लढण्याची क्षमता राहिली नाही. आता देशात बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील आणि फक्त भाजपच राहील. आता कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही जो भाजपला पराभूत करू शकेल. असे धक्कादायक विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातही शिवसेना (Shivsena) संपत चालली आहे. आता महाराष्ट्रात फक्त कमळ फुलणार, असेही त्यांनी म्हटले आहे. ते पाटणा येथे एका जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी जे.पी. नड्डा यांनी पाटणा येथूनच राज्यातील 16 जिल्ह्यांतील भाजप कार्यालयांचे उद्घाटन केले. बिहारमध्ये राजद आणि देशातील इतर प्रादेशिक पक्षांवर निशाणा साधत जेपी नड्डा म्हणाले की. अनेक राज्यांतून काँग्रेस आता संपत चालली आहे. भाजप कार्यालय हे कार्यकर्त्यांचे पॉवर हाऊस आहे. इथून करोडो कार्यकर्ते जन्माला येतील. बिहार ही लोकशाहीची भूमी आहे. येथे केवळ भाजपच कुटुंबवादाच्या विरोधात लढू शकते.

तर, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष हा एक कुटुंबाचा पक्ष आहे. बिहारमध्ये आम्ही कुटुंबीय पक्ष असलेल्या राजदशी लढत आहोत.ओडिशातील नवीन बाबूंचा पक्ष हादेखील वन मॅन पार्टी आहे. तर महाराष्ट्रातही आता शिवसेना नामशेष होण्याच्या मार्गावर होण्याच्या मार्गावर आहे, असे धक्कादायक विधान जे. पी. नड्डा यांनी केले आहे. काँग्रेस हा भाऊ-बहिणीचा पक्ष झाला आहे. पण लढा एकजुटीतून दिला जातो. एकजुटीतून ताकद जन्माला येते. असंही त्यांनी म्हटलं.

पाटण्यात आल्यावर झालेल्या भव्य स्वागताचा संदर्भ देत नड्डा म्हणाले, की कालच्या भेटीवरून भाजपची ताकद कशी वाढत आहे हे दिसून येते. भाजप हा सर्वसामान्य जनतेशी जोडलेला पक्ष आहे.भाजप हा विकासाचा समानार्थी शब्द आहे. आता एका देशात एक राष्ट्र एक कायदा आहे. आम्ही कार्यालय बोलतो, ऑफिस नाही, कार्यालय हे संस्कृतीचे केंद्र आहे. कार्यालय हे संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे. कार्यालयात येऊन लोक संस्कार शिकतात.

भाजप आपल्या कार्यकर्त्यांना संस्कार शिकवते. ऑफिसमध्ये बसल्याने एकत्र काम करण्याचे संस्कार होतात. पण आता काँग्रेससह इतर स्थानिक पक्ष एकतर संपले आहेत किंवा ते लवकरच संपणार आहे. आम्ही वैचारिक पार्श्वभूमी घेऊन उभे आहोत.जर आम्हाला कल्पना असती तर आम्ही एवढा मोठा लढा लढला नसता. सगळे गेले... संपले. जे नाहीसे झाले नाहीत ते लवकरच नष्ट होतील. आथा देशात राहिली तर फक्त भाजपच राहील. भाजप हा वैचारिक पार्श्वभूमी असलेला राजकीय पक्ष आहे. आज दोन-तीन दशके इतर पक्षात राहिलेले अनेक लोक पक्ष सोडून भाजपमध्ये येत आहेत.देशात बदल करण्याचे कोणते साधन असेल तर ते भाजप आहे, हे या सर्वांना समजले आहे. आचा याच कल्पनेच्या आधारे आम्ही दक्षिणेकडील राज्यांमध्येही कमळ फुलवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT