Yogi Adityanath  Sarkarnama
देश

BJP Politics : भाजप उत्तर प्रदेशामध्ये मोठे बदल करणार; मुख्यमंत्री योगींशी मतभेद असलेल्या नेत्यावर मोठी जबाबदारी?

BJP Politics Yogi Adityanath keshav prasad maurya : 2017 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये केशव प्रसाद मौर्य हे होते. ते 2016 मध्ये प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते.

Roshan More

BJP Politics : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. 80 पैकी केवळ 33 जागांवर भाजपचा विजय झाला. त्यामुळे उत्तर प्रदेशात संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्याच्या हालचाली केंद्रीय नेतृत्वाने सुरू केल्या आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी मतभेद असलेले उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2017 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये केशव प्रसाद मौर्य हे होते. ते 2016 मध्ये प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, अचानक योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागली होती. ओबीसी OBC चेहरा म्हणून मौर्य यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश भाजपचे BJP प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी काल (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी उत्तर प्रदेशमधील पराभवा विषयीचे विश्लेषण केले. नंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट भूपेंद्र चौधरी आणि केशव प्रसाद मौर्य यांनी घेतली. तब्बल एक तास त्यांनी नड्डांसोबत चर्चा केली.

दलित चेहऱ्याला संधी?

केशव प्रसाद मौर्य हे ओबीसी नेते आहेत. तर भूपेंद्र चौधरी हे जाट समुदायातून येतात. जयंत सिंह चौधरी हे भाजप सोबत आल्याने जाट समुदाय भाजपसोबत राहिल, असा आत्मविश्वास केंद्रीय नेत्यांना आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने दलित नेत्याला प्रदेशाध्यक्ष पदी संधी द्यावी, असे एका गटाचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT