भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन संसदेत दिसणार का? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच नितीन नवीन यांनी कामाला वेग दिला आहे. केरळ विधानसभा आणि काही महापालिका निवडणुकांसाठी प्रभारी व सहप्रभारींची नियुक्ती हे त्यांचे पहिले महत्त्वाचे पाऊल ठरले. सध्या ते राज्याध्यक्ष, संघटन महामंत्री आणि राज्य प्रभाऱ्यांसोबत सलग बैठका घेत आहेत. लवकरच ते निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत.
अशातच प्रश्न उपस्थित होतो की दोन फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बिहार विधानसभा अधिवेशनात नितीन नवीन सहभागी होणार का? कारण त्यांनी नितीश सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला, तरी ते बांकीपूर मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. जोपर्यंत आमदारकी कायम आहे, तोपर्यंत विधानसभेच्या कामकाजासाठी त्यांना पाटण्याला जावे लागणार आह
पक्षाने इच्छिले तर नितीन नवीन यांना सहजपणे राज्यसभेत पाठवता येऊ शकते. एप्रिलमध्ये बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागा रिक्त होत असून, त्या निवडणुकांत एनडीएचे पारडे जड आहे. पाचपैकी किमान चार जागांवर एनडीएचा विजय निश्चित मानला जातो. त्यातील दोन जागा भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नितीन नवीन यांना राज्यसभेत पाठवणे अवघड नाही. दिल्लीतील संसद भवनाजवळच त्यांना सरकारी निवासस्थानही देण्यात आले आहे, त्यामुळे दिल्लीमध्ये राहून संघटनात्मक काम करणे अधिक सोपे ठरू शकते.
मात्र पक्षातील वरिष्ठ सूत्रांनुसार, सध्या नितीन नवीन यांना राज्यसभेत पाठवण्याचा कोणताही तातडीचा विचार नाही. बिहारशी त्यांचा थेट संपर्क कायम राहावा, हा यामागचा प्रमुख हेतू असल्याचे सांगितले जाते. यासाठी अमित शाह यांचे उदाहरण दिले जाते. राष्ट्रीय अध्यक्ष असतानाही अमित शाह अनेक वर्षे गुजरातचे आमदार राहिले आणि नंतरच राज्यसभेत गेले.
राजकीय जाणकारांच्या मते, बिहारमध्ये सध्या भाजपसमोर तातडीचे मोठे आव्हान नाही. मागील विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठे यश मिळाले आहे. काही काळापूर्वी नितीन नवीन यांना मुख्यमंत्रीपदासाठी तयार केले जात असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या, मात्र पक्षाने त्याला स्पष्ट नकार दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.