Karnataka Politics : भाजप आमदार बी. पी. हरिश यांच्यावर केपीसीसी कार्यालयाबाहेर झालेल्या कथित अंडीफेकीच्या निषेधार्थ भाजपने शुक्रवारी विधानसौध येथे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी कर्नाटकमधीव काँग्रेस सरकारवर टीका करत या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
‘कॉक्रोच जनता पार्टीला शेकडो कोटींचा निधी कोण पुरवत आहे? त्यांच्या जेवणावळीचा खर्च कोण करत आहे?’ अशीही मागणी त्यांनी केली.
आंदोलनात सहभागी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी काँग्रेस (Congress) सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी 'गुंडा सरकार' आणि 'कोतवाल सरकारचा निषेध असो' अशा घोषणा देण्यात आल्या. काही आंदोलकांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे फलकही प्रदर्शित केले.
भाजपचे (BJP) आर. अशोक यांनी आरोप केला की, राज्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत असून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. तसेच त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) या संघटनेच्या निधीबाबत प्रश्न उपस्थित करत, या संघटनेला आर्थिक मदत कोण करत आहे, असा सवाल केला.
नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याचा उल्लेख करत अशोक यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळातही प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्याचा दावा केला. त्या वेळी संबंधित मंत्र्यांनी राजीनामे दिले होते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनीही या घटनेबाबत सरकारवर टीका केली. अंडीफेक आणि हल्ल्याचा आरोप करत त्यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच केपीसीसी कार्यालयात अंडी कशासाठी आणली होती, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला. या आंदोलनात भाजप विधानमंडळ पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद यांच्यासह अनेक आमदार, विधान परिषद सदस्य आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.