Gadchiroli BSF Jawan Martyred : भारत-बांगलादेश सीमेवर गडचिरोलीचा जवान शहीद; घुसखोरांविरोधातील कारवाईत सुरेश आंबडर यांचे सर्वोच्च बलिदान

Gadchiroli BSF jawan Suresh Ambadar martyred during anti-infiltration operation on the India-Bangladesh border : पश्चिम बंगाल सीमेवरील विशेष मोहिमेदरम्यान गोळीबारात गंभीर जखमी; उपचारादरम्यान निधन, मरारटोला गावावर शोककळा
jawan Suresh Ambadar
jawan Suresh AmbadarSarkarnama
Published on
Updated on

India Bangladesh Border Firing : पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान झालेल्या गोळीबारात गडचिरोली जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान सुरेश दुर्गू आंबडर (वय 35) शहीद झाले.

त्यांच्या निधनामुळे मरारटोला गावासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित घुसखोरांना रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान गोळीबार (Border Firing) झाला. या घटनेत जवान सुरेश आंबडर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी त्यांनी देशसेवेत सर्वोच्च बलिदान दिले.

गडचिरोतील (Gadchiroli) सुरेश आंबडर यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांसह गावात शोक व्यक्त करण्यात आला.

jawan Suresh Ambadar
AIMIM Student Protest Police Action : विद्यार्थिनींना मारहाण करणाऱ्या IPS अधिकाऱ्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करा; राष्ट्रपतींकडे AIMIMची मोठी मागणी

भारत (India)-बांगलादेश सीमेवर घुसखोरी आणि सीमापार तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडून सातत्याने विशेष गस्त आणि शोधमोहीम राबविली जाते. यामध्ये सीमेवरील कुंपण, आधुनिक तांत्रिक यंत्रणा तसेच दुर्गम भागात जलमार्गावरील गस्तीद्वारे सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवली जाते.

jawan Suresh Ambadar
Kiran Lahamate Clears Fallen Trees : राष्ट्रवादीच्या आमदाराने भर पावसात हातात घेतली कुऱ्हाड; पुढे काय केले?

जवान आंबडर देशप्रेमी

शहीद सुरेश आंबडर हे गडचिरोली जिल्ह्यातील मरारटोला येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण करून सीमा सुरक्षा दलात प्रवेश मिळवला होता. देशसेवेचे स्वप्न पूर्ण करत त्यांनी अनेक वर्षे कर्तव्य बजावले.

घुसखोर अन् जवानांमध्ये चकमक

प्राथमिक माहितीनुसार, या मोहिमेदरम्यान संशयित घुसखोरांकडून झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संबंधित घटनेबाबत अधिकृत तपशील सुरक्षा यंत्रणांकडून पुढे येण्याची अपेक्षा आहे. शहीद जवान सुरेश आंबडर यांचे पार्थिव लवकरच त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार असून, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com