BJP Rajya Sabha Nominees Sarkarnama
देश

BJP Rajya Sabha seats : संसदेत पुन्हा वाढली भाजपची ताकद, राज्यसभेत मिळाले 9 खासदार

Rajya Sabha election results 2026, Uttar Pradesh Rajya Sabha election, BJP wins eight seats UP : उत्तर प्रदेशात दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे तिसरा उमेदवार देणार असल्याची चर्चा होती.

Rajanand More

BJP wins nine seats : संसदेमध्ये भाजपची ताकद पुन्हा एकदा वाढली आहे. उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून सर्व दहा जागांवरील उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामध्ये भाजपचे आठ आणि समाजवादी पक्षाच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही भाजपचा उमेदवारी बिनविरोध निवडून आला आहे.

राज्यातील दहा जागांसाठी दहाच उमेदवारांचे अर्ज उरल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी घोषित केले. भाजपकडून विद्यासागर सोनकर, प्रियांका सिंह रावत, गोपी कृष्ण पांडे, धर्मपाल सिंह, राधाकांत ओझा, प्रकाश पाल, रामप्रताप सिंह चौहान आणि श्रृती गंगवार यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागा आधीही भाजपकडे होत्या.

समाजवादी पक्षाने ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समूह उपाध्यक्ष धनराज परिमल नाथवानी यांना उमेदवारी दिली होती. तेही आता राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतील. नाथवानी यांचे वडीलही राज्यसभेचे खासदार आहे. मात्र, आता त्यांना एकमेकांसमोरील बाकांवर बसावे लागणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे तिसरा उमेदवार देणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी त्यांना नाथवानी यांना मैदानात उतरविल्याचे सांगितले जात होते. मात्र, अखेरच्या दिवशी त्यांनी तीन नाही, ४०३ जागांवर आपले लक्ष्य असल्याची पोस्ट सोशल मीडियात करत त्यावर पडदा टाकला.

अखिलेश यांनी तिसरा उमेदवार दिला असता तर निवडणुकीत घोडेबाजार होण्याची भीती होती. सत्ताधारी भाजपकडे आठवा आणि सपाकडे तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नव्हते. मतदान झाले असते तर दोन्ही बाजूने क्रॉस वोटिंग झाले असते. दोन्ही पक्षांकडून परस्परविरोधी दावे केले जात होते. अखेर अखिलेश यांनी उमेदवार न दिल्याने निवडणूक टळली.

बंगालमध्येही भाजप

पश्चिम बंगालमध्येही राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने प्रसिध्द अभिनेत्री रुक्मिणी मल्लिक यांना उमेदवारी दिली होती. त्यांची निवडही बिनविरोध झाली होती. राज्यात तृणमूल काँग्रेसची सत्ता असताना त्या पहिल्यांदा राज्यसभेत गेल्या होत्या. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पोटनिवडणूक लागताच भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT