Anupam Hazra, Amit Shah Sarkarnama
देश

Amit Shah News : शाहांच्या बैठकीनंतर काही तासांतच थेट राष्ट्रीय सचिवांना डच्चू

Rajanand More

BJP News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मंगळवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठकाही घेतल्या. पण त्यानंतर काही तासांतच बंगालमधील पक्षाचे नेते अनुपम हाजरा यांना दणका दिला. त्यांना तातडीने राष्ट्रीय सचिवपदावरून हटवण्यात आले.

जे. पी. नड्डा (JP Nadda) यांच्या आदेशानुसार हाजरा (Anupam Hazra) यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे भाजपचे (BJP) महासचिव अरुण सिंह यांनी म्हटले आहे. हाजरा यांना देण्यात आलेली केंद्रीय सुरक्षाही काही दिवसांपूर्वी काढण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना पक्षाच्या महत्त्वाच्या पदावरूनही हटवण्यात आल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.

हाजरा यांनी केलेल्या काही विधानांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांचा याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तृणमूल काँग्रेसमधील (TMC) भ्रष्ट नेत्यांना सीबीआय किंवा ईडीची नोटीस येण्याची शक्यता आहे. अशा नेत्यांनी भाजपमध्ये येण्यासाठी माझ्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी म्हटले होते. त्यावरून तृणमूलने भाजपवर ‘वॉशिंग मशिन’ अशी जोरदार टीका केली होती. भाजपच्या इतर नेत्यांनी याबाबत हात वर केले होते. ते त्यांचे वैयक्तिक मत असून पक्षाचा संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, हाजरा हे मूळचे तृणमूल काँग्रेसमधील आहे. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून जिंकली होती. पण 2019 मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले. भाजपने त्यांना बंगालमधील अनुसूचित जातीचा युवा चेहरा म्हणून पुढे आणले होते. त्यानंतर त्यांना 2020 मध्ये राष्ट्रीय सचिव करण्यात आले होते. तसेच बिहारचे सहप्रभारी म्हणूनही जबाबदारी दिली होती. पण भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये वक्तव्य करून भाजपला अडचणीत आणल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Edited by Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT