Rahul Gandhi News : राहुल गांधी उतरले कुस्तीच्या आखाड्यात, बजरंग पुनियाशी...

Bajrang Punia : कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे राहुल गांधी यांची भेट चर्चेत
Bajrang Punia Rahul Gandhi
Bajrang Punia Rahul Gandhisakarnama
Published on
Updated on

Haryana : राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर विरोधात कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. लैंगिक शोषणाचे आरोप करत बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाईची कुस्तीपटूंची मागणी आहे. मात्र, कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत संघटनेच्या अध्यक्षपदी बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची निवड झाली. याचा निषेध म्हणून कुस्तीपटू साक्षी मलिक हिने निवृत्तीची घोषणा केली. तसेच बजरंग पुनिया याने देखील आपला पुरस्कार परत करणार असल्याचे जाहीर केले. या सगळ्या घडामोडीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी हे बजरंग पुनियाचे गाव असणाऱ्या हरियाणातील छारा येथील वीरेंद्र आखाड्यात पोहोचले.

Bajrang Punia Rahul Gandhi
Kasba Constituency: कसब्यात इतिहासाची पुनरावृत्ती होणार ? हेमंत रासनेंचं सूचक विधान

वीरेंद्र आखाड्यातून बजरंग पुनिया (Bajrang Punia)आणि दीपक पुनिया यांनी कुस्तीची सुरुवात केली होती. राहुल गांधी हे वीरेंद्र आखाड्यात पोहचले त्यावेळी त्यांच्यासोबत बजरंग पुनिया देखील उपस्थित होता.

राहुल गांधी सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान आखाड्यात पोहोचल्यानंतर पैलवानांशी संवाद साधला. त्यांच्या कारकिर्दीत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांचा सराव कसा होतो, कुस्तीमधील डाव कसे असतात, पाॅइंट कसे मिळतात, याची माहिती राहुल गांधी यांनी पैलवानांकडून घेतली.

कुस्तीपटूंचे आंदोलन चर्चेत असताना राहुल गांधी यांनी थेट आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या गावाला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, बजरंग पुनिया याने सांगितले की, राहुल गांधी हे कुस्तीपटूंचे रुटीन कसे असते हे पाहण्यासाठी आले होते. ते आखाड्यात उतरून आपल्यासोबत कुस्ती देखील खेळले.

Edited by Roshan More

Bajrang Punia Rahul Gandhi
Sharad Patil Passed Away : जनता दलाचे नेते, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com