BJP News : वेगवेगळ्या आंदोलनामुळे भाजप काहीशी बॅकफूटला गेलेली दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप कशी कामगिरी करणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्व्हेने भाजप नेत्यांचे टेन्शन वाढणार आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Vote Vibe ने सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये कोणता पक्षाला किती टक्के लोकांची पसंती मिळेल, याची आकडेवारी समोर आली आहे.
भाजपसाठी उत्तर प्रदेशची निवडणूक एकतर्फी असेल असा अंदाज होता मात्र,सर्व्हेतील आकडेवारीनुसार भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये काटे की टक्कर दिसून येत आहे. आकडेवारीमध्ये भाजप आघाडीवर दिसत असला तरी समाजवादी पार्टी त्यांच्यापासून फार दूर नाही.
व्होटर वाइबच्या आकडेवारीनुसार भाजप आघाडीला 41.9 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर, समजावादी पार्टीच्या आघाडीला 39.1 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. या दोघांमधील अंतर अवघे 2.8 टक्के इतके आहे. त्यामुळे भाजपची चिंता वाढणार असल्याची चर्चा आहे.
पसंतीमध्ये भाजपकडे केवळ दोन टक्के मतांची आघाडी दिसत आहे. मात्र, विजयी कोण होणार याबाबत लोकांना विचारले असता त्यामध्ये समाजवादी पार्टी आघाडीवर दिसत आहे. सर्व्हेचे आकडेवारीनुसार 42.2 टक्के लोकांना वाटते की समाजवादी पक्ष विजयी होईल. तर, 41.2 टक्के लोकांना वाटते की भाजप विजयी होईल. येथे एक टक्याने समाजवादी पक्ष पुढे दिसतो आहे.
समाजवादी पक्ष जिंकेल असा अंदाज सर्व्हेमध्ये लोक दर्शवत असतानाच मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांना पसंती देत आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावर अखिलेश यादव यांच्यापेक्षा योेगी आदित्यनाथ हे तब्बल 10 टक्क्यांनी पुढे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.