BJP Leader Murder : राजकारणाचा रक्तरंजित चेहरा! एका फोननंतर बोलावून घेतलं अन् लोखंडी रॉडने संपवलं; भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ...

BJP leader murder case latest news : भाजप नेत्याच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फोन करून बोलावून घेतल्यानंतर लोखंडी रॉडने हल्ला करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जाणून घ्या सविस्तर माहिती.
Nashik Crime
Nashik CrimeSarkarnama
Published on: 
Updated on: 

पश्चिम बंगालमध्ये राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्गापूर येथे कालीपूजेच्या काळात भाजपच्या एका स्थानिक नेत्याची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. श्याम कुमार दास उर्फ सायन असे मृत भाजप नेत्याचे नाव आहे. बुधवारी रात्री फरीदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आतापर्यंत 2 आरोपींना अटक केली आहे.

जमिनीच्या वादातून सायन आणि काही स्थानिक तरुणांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू होता. विजय नंदी, त्याचा भाऊ अजय आणि प्रसून पांडे यांच्यासोबत सायन यांचे वाद असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी रात्री एका फोननंतर सायन यांना घटनास्थळी बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik Crime
BJP Leader : भाजपमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केलेले नेते मुख्यमंत्र्यांसोबत; फोटो व्हायरल, विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये केली होती बंडखोरी

सायन यांचा मित्र रंजन याने दिलेल्या माहितीनुसार, मूर्ती विसर्जन करून परतत असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रंजन याच्या हातालाही दुखापत झाली. याचवेळी सायन घटनास्थळी पोहोचले. काही तरुणांनी लोखंडी रॉड घेऊन त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या मारहाणीत सायन गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी विजय नंदी आणि प्रसून पांडे या दोघांना अटक केली आहे. गुरुवारी त्यांना दुर्गापूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिसरा संशयित अजय याचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी या घटनेची माहिती घेत मृत सायन यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. सायन यांच्या पत्नीला राज्य सरकारमध्ये कंत्राटी तत्त्वावर नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

Nashik Crime
Ayushman Card : आयुष्मान कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ 112 आजारांवर खाजगीत मोफत उपचार बंद! वाचा सविस्तर

सायन हे पांडवेश्वर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या 3 नंबर मंडळाच्या ओबीसी मोर्चाचे महासचिव होते. त्यांचे वडील परिमल दास यांनी फरीदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या हत्येतील सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच हत्येत सहभागी असलेले सर्वजण तृणमूल काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, या राजकीय आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.