Manmohan Singh sarkarnama
देश

BJP Politics : मोदी सरन्यायाधीशांकडे गणपती दर्शनाला, भाजपने शेअर केले मनमोहन सिंग यांचे 'ते' फोटो

Shehzad Poonawalla Manmohan Singh : इफ्तार पार्टीचे आयोजन आधीचे पंतप्रधान त्यांच्या घरीच करायचे. त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहत होते,असा टोला भाजप नेत्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

Roshan More

Shehzad Poonawalla News : सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गणेश आरतीसाठी गेले होते. पंतप्रधान चंद्रचूड यांच्या घरी गणपतीची आरती करत असल्याचा फोटो देखील व्हायरल झाला होता.

यावरून सरन्यायाधीश चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होते आहे. भाजप प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 2009 चे फोटो ट्विट करत पंतप्रधान मोदी यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे.

2009 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन सरन्यायाधीश केजी बालकृष्णन हे इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. ते फोटो शहजाद पूनावाला यांनी ट्विट केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये शहजाद पूनावाले म्हणाले आहेत की, '2009- तत्कालीन सरन्यायाधीश केजी बालकृष्णन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते, हे धर्मनिरपेक्ष आहे. न्यायव्यवस्था सुरक्षित आहे.'

'पंतप्रधान मोदींनी सध्याच्या सरन्यायाधीशांच्या घरी गणेश पूजेला हजेरी लावली, अरे देवा न्यायव्यवस्थेशी तडजोड झाली आहे.', असे ट्विटमध्ये म्हणत पूनावाला यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

पंतप्रधान यांच्या गणेश आरतीला जाण्यावरून विरोधक दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका देखील पूनावाला यांनी केली.

देवेंद्र फडणवीसांचा टोला

इफ्तार पार्टीचे आयोजन आधीचे पंतप्रधान त्यांच्या घरीच करायचे. त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहत होते. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले तर इतका गहजब का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पंतप्रधानांना बोलवणे चूकीचे

कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितले, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश ही दोन्ही पदे घटनात्मक आहेत. सरन्यायाधीशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावले असेल तर ही चूक आहेच, दुसऱ्या बाजुला मात्र जर पंतप्रधान स्वतः हून त्यांच्याकडे गेले असतील तरी देखील सरन्यायाधीश यांनी अशी भेट चूकीची आहे, हे सांगायला पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT