Mamata Banerjee : ममता बॅनर्जींचं मोठं विधान; म्हणाल्या,'...तर CM पदाचा राजीनामा देणार'

kolkata doctor rape murder case mamata banerjee : मी आंदोलक डाॅक्टरांची दोन तास वाट पाहिली पण ते बोलायला तयार नाही. ज्युनिअर डाॅक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे 27 रुग्णांचा जीव गेला आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाले.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

Mamata Banerjee News : कोलकता मधील महिला डाॅक्टरवर झालेल्या अत्याचार हत्येच्या घटनेनंतर डाॅक्टर आंदोलन करत होते. आंदोलन करणाऱ्या डाॅक्टारांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणारे होते. मात्र, या चर्चेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याची मागणी डाॅक्टरांनी केली. त्यामुळे आंदोलक डाॅक्टर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट होऊ शकली नाही.

पत्रकारांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, मेडिकल कॉलेजमधील बलात्कार-हत्या प्रकरणात मलाही न्याय हवा आहे. मला जनतेची माफी मागायची आहे. जनतेची इच्छा असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे.

मी आंदोलक डाॅक्टरांची दोन तास वाट पाहिली पण ते बोलायला तयार नाही. ज्युनिअर डाॅक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे 27 रुग्णांचा जीव गेला आहे. तर, 7 लाखांपेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती पेक्षा जास्त रुग्णांची प्रकृती खालावली आहे. मात्र, तरीसुद्धा मी त्यांच्यावर कारवाई करणार नाही. वडिलकीच्या नात्याने मी त्यांना माफ करते.

Mamata Banerjee
Congress Politics : वडिलांचा पराभव झालेल्या दोन मतदारसंघात काँग्रेसकडून मुलांचे लाँचिंग

लाईव्ह स्ट्रिमिंग का नाही?

ममता म्हणाल्या, म्ही डाॅक्टरांच्या सोबत होण्याऱ्या बैठकीचे व्हिडिओ रेकाॅर्डिंग करण्यास तयार होतो. हे प्रकरण न्यायालयात असल्याने आम्ही या बैठकीचे लाईव्ह स्ट्रिमिंग होऊ देऊ शकत नाही, असेही ममता म्हणाल्या. डॉक्टरांना हवे असते तर आम्ही सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊन बैठकीचे रेकॉर्डिंग डाॅक्टरांसोबत शेअर केले असते.

दोन तास 10 मिनिटे वाट पाहिली

राज्याचे मुख्य सचिव मनोज मंत यांनी काम बंद आंदोलन करणाऱ्या ज्युनिअर डाॅक्टरांना बैठकीसाठी निमंत्रित केले होते. ममता बॅनर्जी यांनी चर्चेसाठी डाॅक्टारांच्या शिष्टमंडळाची दोन तास 10 मिनिटे वाट पाहिली. मात्र, या बैठकीचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यावर डाॅक्टर आडून होते. शेवटी ममता बॅनर्जी यांनी डाॅक्टरांना काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.तसेच जनतेची इच्छा असले तर आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

Mamata Banerjee
Maharashtra Vidhansabha Poll : 'पोल ऑफ पोल'ने वाढवलं महायुती, मविआचे टेन्शन, आकडे काय सांगतात?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com