Internal conflict erupts in BJP over fake case allegations Sarkarnama
देश

Modi cabinet reshuffle : भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे मोदी मंत्रिमंडळात कमबॅक? दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

BJP woman leader may return to Modi cabinet : भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे मोदी मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक होणार का? दिल्लीत वाढलेल्या राजकीय हालचालींमुळे चर्चांना वेग आला आहे.

Rashmi Mane

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 10 जागांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून या निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना पुन्हा एकदा नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी यांचे नाव चर्चेत आले आहे.

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 10 जागांसाठी 29 सप्टेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. सध्या या 10 जागांपैकी 8 जागा भाजपकडे, तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाकडे प्रत्येकी 1 जागा आहे. आगामी निवडणुकीनंतर भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये या जागांची विभागणी होण्याची शक्यता आहे. बसपचे खासदार रामजी गौतम यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यसभेत बसपचे प्रतिनिधित्व राहणार नसल्याची शक्यता आहे.

या सर्व घडामोडींमध्ये स्मृती इराणी यांचे नाव विशेष चर्चेत आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्ष संघटनेतील त्यांची भूमिका वाढली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातून त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे महिला प्रतिनिधित्वाचे समीकरणही साधले जाऊ शकते. मात्र, भाजपची अधिकृत उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतरच या चर्चांना स्पष्टता मिळणार आहे.

भाजपकडून यावेळी काही विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्याऐवजी नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. गीता शाक्य आणि सीमा द्विवेदी यांच्या जागांसाठीही पक्षाकडून पर्यायी नावांचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सामाजिक आणि जातीय समीकरणांचा विचार करून उमेदवारांची निवड होण्याची शक्यता आहे.

ओबीसी समाजातून भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पाल यांच्यासह काही नावांची चर्चा आहे. तर दलित प्रतिनिधित्वासाठी विद्यासागर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. गीता शाक्य यांच्या जागेसाठी ममतेश शाक्य यांच्यासह इतर संभाव्य उमेदवारांचीही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, डॉ. दिनेश शर्मा यांनी अंदमान-निकोबारच्या उपराज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर 11 सप्टेंबर रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या रिक्त जागेसाठी ब्राह्मण समाजातील चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता असून हरीश द्विवेदी यांचे नाव चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT