Ramesh Mhatre news : शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका; जामीन रद्द, तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश

Shiv Sena corporator, bail cancelled, medical fraternity, doctors attack : वैद्यकीय समुदायाला हात लावता येणार नाही, अशा संदेश समाजात जायला हवा, असे सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे.
The Supreme Court cancelled the bail of Shiv Sena corporator Ramesh Mhatre.
The Supreme Court cancelled the bail of Shiv Sena corporator Ramesh Mhatre.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Supreme Court latest news : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक रमेश म्हात्रे यांना सुप्रीम कोर्टाने सोमवारी जोरदार झटका दिला. वैद्यकीय समुदायाला हात लावता येणार नाही, अशा कडक शब्दांत सुनावत कोर्टाने त्यांचा जामीन रद्द केला आहे. तसेच पुढील तीन दिवसांत पोलिसांना शरण येण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य काही जणांवर आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच मुंबई हायकोर्टाने त्यांना काही अटींसह जामीन दिला होता. हायकोर्टानेही जामीन देताना कठोर भूमिका घेतली होती. आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहण्याची अट घालण्यात आली होती.

हायकोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्र सरकारने म्हात्रे यांचा जामीन रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली.

The Supreme Court cancelled the bail of Shiv Sena corporator Ramesh Mhatre.
BJP Government : गुन्हेगारी बेलगाम, पाठिंबा देत असल्याची लाज वाटते! केंद्रीय मंत्र्यांचा आपल्याच सरकारला घरचा आहेर, आता राजीनाम्याची मागणी

वैद्यकीय समुदायाला हात लावता येणार नाही, अशा संदेश समाजात जायला हवा. वैद्यकीय क्षेत्र लोकांची सेवा करते आणि त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला केला जाऊ शकत नाही, असे कोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटले. म्हात्रे प्रकरणानंतर याच पक्षाशी संबंधित अशीच एक घटना घडल्याचे निरीक्षणही सुप्रीम कोर्टाने नोंदविले आहे.

The Supreme Court cancelled the bail of Shiv Sena corporator Ramesh Mhatre.
SC to OBC demand : आम्हाला अनुसूचित जातीत राहायचं नाही, OBC मध्ये समावेश करा! 'या' समाजाने केली धक्कादायक मागणी

दरम्यान, म्हात्रे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ दवे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की, दोन साक्षीदारांची साक्ष आधीच असून तक्रारदार, एक महिला डॉक्टर, यांची साक्ष ३ ऑक्टोबरला होणार आहे. खटल्याची सुनावणीत कोणताही अडथळा नसल्याचा युक्तिवाद दवेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com