PM Narendra Modi Journey From CM to PM : भाजपने मिशन २०२४ साठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (२०२४) आपल्या काय योजना आहेत, हे भाजपने एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आहे.
अँनिमेटेड व्हिडिओ भाजपने समाज माध्यमावर प्रसारित केला आहे. 'मुझे चलते जाना है...'असे या व्हिडिओला शीर्षक दिले आहे. साडेचार मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात केलेल्या विविध कामाचा आढावा या व्हिडिओत घेण्यात आल्याचे दिसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कशापद्धतीने विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या निशाणावर असतात, हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा मोदींचा प्रवास, २०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास कसा आहे, हे या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.
"मौत का सौदागर" ते "चायवाला"
व्हिडिओच्या सुरवातीला पंतप्रधान मोदी हे सीडी चढताना दिसतात. सुरवातीला २००७ गुजरात मुख्यमंत्री, असे लिहिलेले आहे. त्यानंतर मोदी पुढील पायरी चढतात, तेव्हा काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी दिसतात. सोनिया या यमराजकडे सांकेतिक इशारा करतात, यमराज ज्या रेड्यावर बसलेला आहे, त्यावर "मौत का सौदागर" असे लिहिले आहे.
५ ट्रिलियन...
या व्हिडिओत काँग्रेसचे नेते मोदींना विविध ठिकाणी अडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. यातून मोदी हे पंतप्रधानपदापर्यंत कसे पोहचले, हे दाखविले आहेत. व्हिडिओच्या अखेर ५ ट्रिलियन असे लिहिलं आहे. देशाचा आर्थिक विकास कसा वाढत गेला हे या माध्यमातून दाखविण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.