Budget Session : राहुल गांधींनी मौन सोडलं ; लंडन येथील वादग्रस्त विधानावर पहिली प्रतिक्रिया..

Budget Session Live Updates : माफी मागणार का, यावर राहुल गांधी माध्यमांशी बोलत होते.
Rahul Gandhi, Latest News
Rahul Gandhi, Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Budget Session Live Updates :काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या विधानावरुन काही दिवसापासून संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपने विरोधक काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरे सत्र सोमवारी सुरू झाले. तेव्हापासून रोज या विषयावर भाजपचे नेते काँग्रेसवर टीका करीत आहे

काही दिवसापूर्वी राहुल गांधी हे लंडनच्या दौऱ्यावर होते. केंब्रिज विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी देशाची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या विषयावर राहुल गांधी यांनी आज पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul Gandhi, Latest News
Budget Session : विधीमंडळ परिसरात अधिकार कुणाचे ? ; नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर गोऱ्हे भडकल्या..

राहुल गांधी आज संसदेत पोहचले. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्या विधानावर भाष्य केले. "लंडन येथील केंब्रिज विद्यापीठात मी भारताच्या विरोधात कुठलेही वादग्रस्त विधान केले नाही. जर विरोधक मला संसदेत याबाबत बोलण्यास संधी देणार असतील, तर मी याचे उत्तर देईल," माफी मागणार का, यावर राहुल गांधी माध्यमांशी बोलत होते.

Rahul Gandhi, Latest News
Border Conflict : सीमाप्रश्नानं पुन्हा डोकं वर काढलं ; शिंदेंनी जाहीर केलेला निधी बोम्मई रोखणार ? ; काय आहे प्रकरण ?

राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात म्हणाले होते की, संसदेत माईक बंद केले जातात. विरोधक आवाज उठवू शकत नाही. ते म्हणाले की, विरोधी पक्षाचा कोणताही नेता कोणत्याही विद्यापीठात जाऊन बोलू शकतो. परंतू तो संसदेच्या सभागृहात बोलू शकत नाही. भारतातील लोकशाहीवर हल्ला होत आहे.

काही दिवसापूर्वी राहुल गांधी हे लंडनच्या दौऱ्यावर होते. केंब्रिज विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी देशाची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात म्हणाले होते की, संसदेत माईक बंद केले जातात. विरोधक आवाज उठवू शकत नाही. ते म्हणाले की, विरोधी पक्षाचा कोणताही नेता कोणत्याही विद्यापीठात जाऊन बोलू शकतो. परंतू तो संसदेच्या सभागृहात बोलू शकत नाही. भारतातील लोकशाहीवर हल्ला होत आहे.

Rahul Gandhi, Latest News
SSC Maths Paper Leak: धक्कादायक : दहावीचा गणित भाग 1 चा पेपर फुटला ? ; महिला सुरक्षा रक्षकावर..

राहुल गांधी यांच्या विधानावरुन भाजप-काँग्रेसचे नेते आमने-सामने आले होते. राहुल गांधी यांनी देशाची केलेल्या बदनामीवरुन त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली. पियूष गोयल म्हणाले, "राहुल गांधी यांनी संसदेत येऊन माफी मागावी," यावर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "देश संविधानानुसार चालत नाही,"

भाजपचे खासदार राज्यवर्धन राठोड म्हणाले, "काही खेळाडू हे आपल्या टीमच्या विरोधात काम करीत असतात. त्याचप्रमाणे राहुल गांधी असेच खेळाडू आहेत. जगभरात देशाला बदनाम करण्याच काम राहुल गांधी करीत आहेत. जगाच्या गोष्टी नंतर करा, पहिल्यादां राजस्थानमध्ये काँग्रेसची परिस्थिती काय आहे, ते सांगा,"

काँग्रेस नेत्यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये चीनमध्ये देशाच्या केलेल्या बदनामीची भाजपला आठवण करुन दिली भारतातील लोकशाही संकटात असल्याचे विधान मोदींनी चीनमध्ये केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com