Narendra Modi-Amit Shah
Narendra Modi-Amit Shah  Sarkarnama
देश

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी-शहा घेणार मोठा निर्णय? : भाजपच्या अनेक नेत्यांना बसणार धक्का...

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. देशातील निम्म्या राज्यातील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केली आहे. या निर्णयामुळे भाजपच्या अनेक नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, नव्या प्रदेशाध्यक्षांची नेमणूकही याच महिन्यात करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. ( BJP will change half of the state presidents in the country )

भारतीय जनता पक्षाचे लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. जो मतदारसंघ पक्षाने कधीही जिंकला नाही, अशा मतदारसंघातही भाजपने काम सुरू केले आहे. अशा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता भाजपने देशातील निम्म्या राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तराखंड, ओडिशा, दिल्ली, गोवा, हिमाचल प्रदेश या राज्यांतील विद्यमान प्रदेशाध्यक्षांना घरी बसवून नव्या चेहऱ्यांना या पदावर भाजपकडून संधी दिली जाऊ शकते. त्यातून आपल्या नेहमीच्या स्टाईलने मोदी-शहा निर्णय घेणार आहेत, त्यातून अनेक नेत्यांना धक्के बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपच्या मुख्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ येत्या जानेवारी महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यांना पुन्हा अध्यक्ष करण्यासाठी निम्म्या राज्यात निवडणूक प्रक्रिया राबवविणे पक्षाच्या घटनेनुसार बंधनकारक आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरअखेर देशातील निम्म्या राज्यांतील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलणार हे निश्चित मानले जात आहे.

बूथ पातळीवर संघटना आणखी मजबूत करण्याचा करण्याबाबत चर्चा झाली आहे. तसेच, या बूथवरील कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सक्रीय राहण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे पक्षाचे उपाध्यक्ष रमण सिंह यांंनी स्पष्ट केले. एकंदरीतच २०२४ नंतरही सत्तेत येण्यासाठी भाजपने नियोजनपूर्वक वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप कोणते मोठे निर्णय घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT