मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाल्या सुषमा अंधारे पहा....

उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर टीका करणाऱ्या विरोधकांच्या बुद्धीची कीव येते, अशी टीकाही अंधारे यांनी केली.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

उमरगा (जि. उस्मानाबाद) : एकेकाळी मी शिवसेनेची (Shivsena) कट्टर टीकाकार होते. पण, आता शिवसेनेचे जीव तोडून काम करीत आहे. मी शिवसैनिक आहे आणि शेंडेफळ आहे. पदापेक्षा काम करीत राहाण्याला प्राधान्य देणारी आहे, असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सांगितले. (I Will prefer to continue working than post : Sushma Andhare)

मुख्यमंत्रिपदी महिलेला स्थान देण्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले आहे. त्यामुळे आपण आशावादी आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अंधारे यांनी हसून वरील उत्तर दिले. महाप्रबोधन यात्रेनिमित्त अंधारे या सोमवारी (ता. ५ डिसेंबर) उमरगा येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी महाप्रबोधन यात्रेची संकल्पना सांगत भाजपवर टीका केली.

Sushma Andhare
मेंढपाळ बांधवांसाठी महिनाभरात एक मोठी योजना घोषित करणार : फडणवीसांची माहिती

अत्यंत संयमी, मितभाषी असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर टीका करणाऱ्या विरोधकांच्या बुद्धीची कीव येते, अशी घाणाघाती टीकाही अंधारे यांनी केली. कृती कार्यक्रम, विकासाच्या मुद्द्यावर अपयशी ठरलेल्या भाजपने लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ठरवून महापुरुषांचा अपमान करण्याचा कार्यक्रम करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Sushma Andhare
भाजपचा 'तो' दावा राष्ट्रवादीने काही तासांतच खोडला : ‘भरणेंच्या कामाचे श्रेय हर्षवर्धन पाटलांनी घेऊ नये’

त्या म्हणाल्या, राष्ट्रपुरुष, महापुरुषांच्या कर्तृत्वाची महाराष्ट्राला गौरवशाली परंपरा आहे, मात्र भाजपच्या राजकारणामुळे संस्कृतीला गालबोट लागत आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता, अखंडतेच्या विचारांचे बीजारोपण पुन्हा एकदा करण्याची गरज आहे. नेमकी हीच भूमिका घेऊन प्रबोधन यात्रेत विचारमंथन होत आहे. यात्रेत प्रश्न, मुद्दे उपस्थित करीत आहे. त्याचे उत्तर मिळण्याऐवजी एकेरी टीका होत आहे. भाऊ, दादा, अण्णा, काका म्हणून प्रश्न विचारत असताना विरोधक मात्र माझा ‘बाई’ म्हणून उल्लेख करतात. याचा अर्थ त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि संस्काराची ओळख महाराष्ट्राला होत आहे. बौद्धिक उंचीने आमनेसामने चर्चा करायला या, हरले तर तुमचे शिष्यत्व स्वीकारेन, असे आव्हान त्यांनी भाजप व मनसेच्या नेतेमंडळींना दिले.

Sushma Andhare
गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या रिंगणात : काय आहे त्यांचा महाराष्ट्राशी संबंध?

महाजन यांना त्याचे काहीच वाटत नाही

मनसेचे प्रकाश महाजन यांच्या आरोपाला बगल देत त्यांनी प्रमोद महाजन यांच्या कुशल नेतृत्वाचा संदर्भ दिला. त्या म्हणाल्या, महाजन-मुंडे यांचे अतूट नाते आहे. त्याच विचारसरणीतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर राजकीय कुरघोडी करीत आहेत. भाची म्हणून प्रकाश महाजन यांना त्याचे काहीच वाटत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com