Narendra modi, Amit shah  Sarkarnama
देश

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच भाजप करणार 150 उमेदवार फायनल; 'या' खासदारांचा होणार पत्ता कट

Sachin Waghmare

Delehi News : आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वंच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. 'इंडिया' आघाडी आणि भाजपच्या बैठकीचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'एक कुटुंब एक तिकीट' यावर एकमत झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात धक्कादायक फेरबदल करण्यात येणार असून बऱ्याच ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकारिणीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक दृष्टीने सर्व कामांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच किमान 150 उमेदवारांची नावे निश्चित करण्याचे भाजपने ठरवले आहे. त्यासोबतच 'एक कुटुंबात एकच तिकीट' या सूत्राचे कटाक्षाने पालन केले जाणार आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी देणा

2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवतकरच केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ खासदारांना पक्ष संघटनेकडे वळवले जाणार आहेत. त्यासोबतच 2024 च्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.

काही जणांचा राजकारण करणे म्हणजे फक्त तिकीट मिळवून आमदार, खासदार, मंत्री बनणे हा भ्रम आहे. हा भ्रम आपल्या लवकरच सोडावाच लागेल, असा इशारा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दिला होता. त्या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अनेक धाडसी प्रयोग केले होते. हे प्रयोग तीन राज्यांत यशस्वी झाले आहेत. मध्य प्रदेशात तब्बल 61 टक्के आणि छत्तीसगडमध्ये 55 टक्के मंत्री हे प्रथमच आमदार झालेले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोनदा खासदार झालेल्यांची वाट बिकट

दोन वेळा किंवा त्यापेक्षा अधिक काळ खासदार असलेल्यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. या खासदारांना नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी संघटनात्मक कामाकडे वळवले जाणार आहे. राज्य पातळीवर काम करणाऱ्या पक्ष नेत्यांना दिल्लीत आणले जाईल, अशी चिन्हे आहेत.

तावडे, पंकजा मुंडेंना संधी?

त्यासोबतच येत्या काळात इतर राज्यांत व दिल्लीत पक्ष संघटनेचे काम करणाऱ्यांना राज्यात लोकसभेची निवडणूक लढण्यास सांगण्यात येऊ शकते. त्यामुळे अशा नेत्यांमध्ये माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे (Pankja Mundhe), राधा मोहन अग्रवाल आदींची नावे चर्चेत आहेत.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT