Shiv sena Shinde Gat : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देताच नेत्याने घेतली उद्योगमंत्र्यांची भेट; बंद दाराआड खलबतं

Uday Samant Sudesh Mayekar Meeting In Ratnagiri : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर नेत्याने घेतली शिंदेंच्या मंत्र्याची भेट...
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Politics News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी आठवडाभरापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री उदय सामंत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे या भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व आहे.

सामंत यांच्या निवासस्थानी मयेकर यांची बंद दाराआड तब्बल वीस मिनिटे ही भेट झाली. या भेटीचे नेमके गुपित काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. राजीनामा दिल्यानंतरच त्या भेटीचा योग जुळल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मयेकर सामंत भेटीमुळे आता मयेकर शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेणार का? या चर्चेला सुरुवात झाली आहे.

Uday Samant
Uday Samant : ''...फक्त मंत्री सकारात्मक असून चालत नाही'' ; उदय सामंतांचं विधान!

प्रकृतीचे कारण देत मयेकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाचा अचानक राजिनामा दिला होता. रत्नागिरी शहरातील थिबापॅलेस येथील निवासस्थानी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सुदेश मयेकर यांच्याशी 20 मिनिटे चर्चा केली. मात्र या चर्चेचा नेमका तपशील कळू शकला नाही.

आठवडाभरापूर्वीच मयेकर यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. राज्यात मोठ्या राजकीय भूकंपानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. मयेकर यांनी जिल्हा दौरा करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ दिले होते. राजीनामा देताना आपल्याला पक्षाने संधी दिल्यास आपण विधानसभा निवडणूक लढविणार, असेही त्यांनी म्हटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली होती. उदय सामंत यांच्या भेटीनंतर सुदेश मयेकर आता पुन्हा राजकारणात सक्रिय होत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. वाढदिवसाच्या दिवशीच भेट घेत सामंत यांनी मयेकर यांच्या निवासस्थानी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख विपिन बंदरकर आधी निकटवर्तीय उपस्थित होते.

edited by sachin fulpagare

Uday Samant
Uday Samant: 'पदाधिकारी भाजपचे, सेवा ठाकरे गटाची'; उदय सामंतांनी सुनावले खडेबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com