Basavaraj Bommai Sarkarnama
देश

Basavaraj Bommai Big Statement: कर्नाटकमध्ये भाजप लोकसभेच्या 25 जागा जिंकेल; बसवराज बोम्मईंचा मोठा दावा

Karnataka News: "कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजपच्या पराभवाला मी जबाबदार"

सरकारनामा ब्यूरो

Political News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपने तर देशातील विविध शहरात मेळावे देखील घेण्यास सुरवात केली आहे. आता यावरच बोलताना भाजपचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मोठा दावा केला आहे.

"आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजप 25 जागा जिंकेल. देशामध्ये जनता पुन्हा भाजपला कौल देईल", असा मोठा दावा बसवराज बोम्मई यांनी केला आहे. बेळगावमधील आयोजित सभेत बसवराज बोम्मई बोलत होते.

बसवराज बोम्मई म्हणाले, "पटनामध्ये आघाडीतील महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत मोदी यांना कसे पराभूत करता येईल, त्यावर चर्चा झाली. मात्र, राहुल गांधी यांचे लग्न होणार नाही, जितके सत्य आहे. तितकेच सत्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पराभूत होणार नाहीत", असा खोचक टोला बसवराज बोम्मई यांनी लगावला आहे.

"लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं स्वरुप वेगळं आहे. नरेंद्र मोदी यांनी आल्यापासून कार्यक्षम प्रशासन दिलं आहे. मोदींना तोंड देण्यासाठी विरोधी पक्षाकडे नेता नाही. कर्नाटकमध्ये भाजप पुन्हा 25 जागा जिंकेल. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा ", असं ते म्हणाले.

"कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजपच्या पराभवाला मी जबाबदार आहे. प्रामाणिकपणे काम करून क्षेत्राचा विकास केला. मात्र, विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरलो. काँग्रेसची गॅरंटी योजना परिवहन संस्था बंद पाडणार आहे. महिलांना मोफत बस सेवेची घोषणा संस्थेला आर्थिक अडचणीत ढकलत आहे. यामुळे बसेस विनाडिझेल थांबतील ", असं ते म्हणाले.

"कर्नाटक विजेविना अंधारात बुडणार आहे. एकाच महिन्यात या सरकारची लोकप्रियता कमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाऊस नाही, जलाशयात पाणी नाही, याचा विचार ते करत नाहीत. तांदूळ दिला नाही त्याचा काय निषेध करायचा नैतिकता आहे.

भाजपला भ्रष्ट ठरविण्याचे षडयंत्र रचले गेले. आता या सरकारकडून टक्केवारी निश्चित केली जात आहे. मंत्र्यांनी ठेकेदारांना बोलावून काय सांगितले ते मला माहिती असून कर्नाटक आता दिल्लीच्या नेत्यांसाठी एटीएम झालं आहे", अशी टीका बसवराज बोम्मई यांनी केली.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT