New Name of Oppositions Alliance पाटण्यातील बैठकीनंतर डी. राजा यांनी सांगितलं विरोधी पक्षांच्या नव्या आघाडीचं नवं नाव

National Politics : बिहारमधील पाटणा येथे 23 जून रोजी देशभरातील 15 विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली.
Patna opposition meeting
Patna opposition meetingSarkarnama
Published on
Updated on

New Name of Oppositions Alliance : बिहारमधील पाटणा येथे 23 जून रोजी देशभरातील 15 विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीबाबत नवी माहिती समोर आली आहे. आमची विचारधारा जरी वेगळी असली तरी लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही भाजपविरोधात एकत्रितरित्या लढू, अशी घोषणाच या विरोधीपक्षाच्या नेत्यांनीकेली आहे.

येत्या काही दिवसांतच शिमल्यात पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार असून या नव्या आघाडीची रूपरेषा ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, सध्या तरी नव्या युतीच्या नावाबाबत मोठा खुलासा झाला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डी. राजा. यांनी नव्या आघाडीचे नाव निश्चित झाल्याचा दावा केला आहे. (Opposition Meeting)

Patna opposition meeting
Marathi Sahitya Sammelan Breaking : ९७ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड

भाजपविरोधात (BJP) एकत्र आलेल्या १५ विरोधी पक्षांच्या या आघाडीचे नाव देशभक्त लोकशाही आघाडी (Patriotic Democratic Alliance) असे असेल, असे डी. राजा. यांनी म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निमंत्रणावरून 23 जून रोजी पाटण्यात विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडली. पंधरा राजकीय पक्षांनी एकजुटीने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 15 राजकीय पक्षांनी एकत्रितपणे सहभागी होण्याचा आणि भाजप-संघ मुक्त भारत तयार करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प व्यापक राष्ट्रीय हितासाठी लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी एक स्वागतार्ह सुरुवात असल्याचंही डी. राजा यांनी म्हटलं आहे. (Marathi news)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com