BJP

 

Sarkarnama

देश

काँग्रेसला मागे टाकूनही एका जागेमुळं भाजपचं बहुमताचं स्वप्न मिळालं धुळीस..

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकात स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Election) भाजप (BJP) हा 12 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेस (Congress) 11 जागांसह दुसऱ्या स्थानी तर धर्मनिरपेक्ष जनता दलाला (JDS) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. परंतु, विधान परिषदेत बहुमत मिळवण्याचे भाजपचे स्वप्न केवळ एका जागेमुळे धुळीस मिळाले आहे.

कर्नाटकात स्थानिक स्वराजसंस्था मतदारसंघाच्या निवडणुका 10 डिसेंबरला झाल्या. या निवडणुका 25 जागांसाठी झाल्या. काँग्रेसचे विद्यमान 14 आमदार, भाजपचे 7 तर जेडीएसचे 4 आमदार यांचा कार्यकाळ पुढील वर्षी 5 जानेवारीला संपत आसल्याने या निवडणुका झाल्या. यात भाजपला 12, काँग्रेसला 11, जेडीएसला 1 आणि इतरांना 1 अशा जागा मिळाल्या. या निवडणुकीनंतर विधान परिषदेत बहुमत मिळेल, असा भाजपला कयास होता. परंतु, केवळ एका जागेमुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठला आला नाही.

राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांच्यासाठी या निवडणुका नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या होत्या. त्यांना यात यश आले असले तरी विधान परिषदेतील बहुमत मिळवता आले नाही. विधान परिषदेत बहुमत नसल्याने भाजपला जेडीएसची मदत घ्यावी लागत आहे. आताही भाजपला जेडीएसवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीत बसला होता फटका

दरम्यान, कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांत बोम्मई यांना त्यांच्या जिल्ह्यातच मोठा धक्का बसला होता. हनगळमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. बोम्मई हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात झालेली ती पहिलीच निवडणूक होती. सिंदगी आणि हनगळ या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या होत्या. यातील हनगळची जागा भाजपकडे तर सिंदगीची जागा धर्मनिरपेक्ष दलाकडे (जेडीएस) होती. या जागांसाठी भाजपसह काँग्रेस आणि जेडीएसने जोर लावला होता. हनगळ हा मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. येथून काँग्रेसचे श्रीनिवास माने विजयी झाले होते. भाजप दुसऱ्या तर जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर राहिला. सिंदगीमध्ये भाजपने विजय मिळवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT